आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा महिन्यांच्या बंदीनंतर मारिया शारापोवाचे विजयी पुनरागमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुअट गार्ट - रशियाची टेनिस स्टार मारिया शारापोवाने स्टुटगार्ट ग्रां.प्री. टेनिस स्पर्धेत इटलीच्या रॉबर्टो विन्सीला ७-५, ६-३ने पराभूत करून विजयी पुनरागमन केले. डोपिंगमुळे १५ महिने टेनिसपासून दूर असलेल्या शारापोवाने आपल्या दमदार खेळाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. १५ महिन्यांच्या बंदीनंतर प्रेक्षकांनी शारापोवाचे कोर्टवर जोरदार स्वागत केले. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या  क्वार्टर फायनलमध्ये हरल्यानंतर शारापोवाचा हा पहिला सामना होता. स्टुटगार्ट क्ले कोर्टवर तीन वेळा विजेता असलेल्या शारापोवाला स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश देण्यात आला. पुढच्या फेरीत शारापोवाचा सामना रशियाच्या एकेतरिना माकारोवाशी होईल.  
 
शारापोवा धोकेबाज : बुकार्ड  
मारिया शारापोवा धोकेबाज आहे. अशा खेळाडूंना पुन्हा खेळण्याची परवानगी देऊ नये. जे खेळाडू योग्य पद्धतीने खेळतात आणि प्रामाणिक आहेत, त्यांच्यासाठी हिचे पुनरागमन वाईट आहे. वुमन्स टेनिस असोसिएशनने या निर्णयाने युवा खेळाडूंना चुकीचा संदेश दिला आहे, असे कॅनडाची टेनिसपटू युजनी बुकार्डने म्हटले.  
बातम्या आणखी आहेत...