आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामना गमावताच शॉपिंगला जाते मारिया शारापोवा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिसची सर्वात मोठी सेलिब्रिटी मारिया शारापोवाने अद्याप बंदीची शिक्षा संपवून कोर्टवर पुनरागमनसुद्धा केलेले नाही आणि इकडे तिला एंडोर्स करण्यासाठी कंपन्यांनी लाइन लावली आहे. सलग सहा वर्षे फोर्ब्जच्या १०० सेलिब्रिटीमध्ये तिचा समावेश होता. कोर्टवर आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या शारापोवाचे छंदही चकित करणारे आहेत. सामना हरल्यानंतर तिला शॉपिंग करणे आवडते, तर जिंकल्यानंतर ती सराव करते.

रशियाच्या मारिया शारापोवाने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच टेनिस खेळण्यास सुरुवात केली. बालपणी तिचा आणखी एक छंद होता. ती टपाल तिकीट जमा करायची. जपानमध्ये तर तिच्यावर एक टपाल तिकीट जाहीर झाले आहे. कोर्टवर रिटर्न करताना जोऱ्याने ओरडत असल्यामुळे सैबेरियन सायरन नावाने ती प्रसिद्ध झाली. ती सर्वाधिक १०५ डेसिबलपर्यंत कोर्टवर ओरडली आहे.

१९ एप्रिल १९८७ रोजी न्यागान (रशिया) तिचा जन्म झाला. ती दोन वर्षांची असताना आईवडील सोच्चीला शिफ्ट झाले. तिचे वडील युरी शारापाेवाच्या एका मित्राने तिला सर्वात अाधी एक टेनिस रॅकेट भेट दिली. त्या वेळी ती ४ वर्षांची होती. तिने १९९३ मध्ये नवरातिलोवाच्या टेनिस क्लिनिकमध्ये सहभाग घेतला. शारापोवा गॉड गिफ्ट असून तिच्यात टेनिसची जबरदस्त क्षमता आहे, असे यादरम्यान नवरातिलोवाने तिच्या वडिलांना सांगितले. एक वर्षानंतर युरीने चांगल्या ट्रेनिंगसाठी अमेरिकेकडे आगेकूूच केली. आर्थिक अडचणीमुळे युरीने भांडी धुण्याचे कामसुद्धा केले. व्हिसाच्या अडचणीमुळे शारापोवाची आई येलेना दोन वर्षांनी अमेरिकेत आली. ९ वर्षांची असताना मारिया रिक मॅकीच्या अकादमीत जॉइन झाली. येथून तिच्या प्रोफेशनल करिअरला सुरुवात झाली.

शारापोवा ११ वर्षांची असताना तेव्हा नाईकीने ितच्यासोबत करार केला. हा करार २०१६ पर्यंत कायम होता. डोपिंगमध्ये अडकल्यानंतर नाईकीने हा करार संपवला. आता नाईकीला पुन्हा तिच्यासोबत काम करायचे आहे. २०१० मध्ये तिने रेने लाकोस्टे आणि फ्रेड पॅरीसोबत कपड्याचे आपले ‘नाईकी मारिया शारापोवा’ कलेक्शन लाँच केले. तिने ‘शुगरापोवा’ नावाने कँडीसुद्धा लाँच केली आहे. याशिवाय तिच्या नावे (मारिया शारापोवा परफ्यूम) स्वत:चे परफ्यूम बनले आहे. तिच्या गळ्यात क्रॉसचे एक नेकलेस आहे. याला ती कधीही काढत नाही. मुलांच्या फाउंडेशनला मदत करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिने खेळाडूंसाठी चॅरिटी सामने आयोजित केले आहे. यातून जमा झालेला निधीही तिने सामाजिक कार्यासाठी दिला. यामुळे तिचा सामाजिक उपक्रमातील सहभाग दिसताे.

आपण चुकीने डोपिंग केले. औषधी घेताना हे डोपिंग झाले. यात बंदी असलेले औषध होते, हे माहिती नव्हते, असे शारापोवाने डोपिंगबाबत सांगितले होते. आता क्रीडा लावादाच्या निर्णयानंतर ती लवकरच कोर्टवर दिसेल.
बातम्या आणखी आहेत...