आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-मार्टिना अंतिम अाठमध्ये, मिळवला सलग २७ वा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीसने मंगळवारी अापली विजयाची लय अबाधित ठेवताना सत्रातील दुसऱ्या टेनिस स्पर्धेत दमदार सुरुवात केली.


या जाेडीने शानदार विजयी सलामी देत सिडनी अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम अाठमध्ये धडक मारली. सानिया अाणि मार्टिनाचा हा सलग २७ वा विजय ठरला. त्यांनी महिला दुहेरीच्या सलामी सामन्यात अनास्तासिया राेडाेअाेनाेवा -अरिना राेडाेअाेनाेवाचा पराभव केला. त्यांनी ६-२, ६-३ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. या विजयासह त्यांना उपांत्यपूर्व फेरीत दिमाखदारपणे प्रवेश करता अाला.

बाेपन्ना-मर्जिया विजयी
भारताच्या राेहन बाेपन्नाने राेमानियाच्या फ्लाेरीन मर्जियासाेबत विजय संपादन केला. यासह या चाैथ्या मानांकित जाेडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या जाेडीने डॅनियल अाणि काेटीनेईनवर ६-७, ६-३, १०-८ अशा फरकाने विजयाची नाेंद केली.

पेस सलामीला पराभूत
भारताच्या लिएंडर पेसला सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला. पेस अाणि जेरेमी चार्डीचा पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत मार्सेलाे-डॅनियल नेस्टरने पराभव केला. या जाेडीने एक तास ८ मिनिटांच्या रंगतदार लढतीत ६-४, ६-४ ने एकतर्फी विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...