आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 30 वर्षानंतर कमबॅक, 70 वर्षीय महिलेने जिंकली बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरी क्लेटन हिने नुकताच अांतरराष्ट्रीय नॅचरल बाॅडी बील्डिंग चॅम्पियनशिपमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वजन गटाचा किताब जिंकला. - Divya Marathi
मेरी क्लेटन हिने नुकताच अांतरराष्ट्रीय नॅचरल बाॅडी बील्डिंग चॅम्पियनशिपमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वजन गटाचा किताब जिंकला.
सनसाइन काेस्ट (अाॅस्ट्रेलिया) - वयाच्या 70 व्या वर्षी अनेक जण विश्रांती घेतात. मात्र मेरी क्लेटन याला अपवाद ठरली. तिने या उतरत्या वयातही अापला जुना छंद जाेपासण्यावर अधिक भर दिला. यातूनच तिने बाॅडी बील्डिंगचा सराव सुरू केला अाणि अल्पावधीत चॅम्पियन हाेण्याचा बहुमानही पटकावला. तिने नुकताच अांतरराष्ट्रीय नॅचरल बाॅडी बील्डिंग चॅम्पियनशिपमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वजन गटाचा किताब जिंकला. ती या वयाेगटात सर्वात वयस्कर महिला बाॅडी बिल्डर ठरली.

तारुण्यात असताना मी बाॅडी बील्डिंगकडे वळले. मात्र, अाता तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा या खेळाकडे लक्ष घातले. यासाठी तिने नित्यनेमाने जिममध्ये जाऊन वर्कअाऊट करण्यास सुरुवात केली. चार महिन्यांपूर्वी तिने सरावाला सुरुवात केली. अाठवड्यातील सहा दिवस क्लेटनने पहाटे ४.३० वाजता उठून जिममध्ये सराव केला. त्यानंतर तिला पुन्हा एकदा अापल्या खेळाकडे यशस्वीपणे कमबॅक करता अाले. यासाठी तिने १० किलाे वजनही वाढवले.

‘जिम सुरू केल्यानंतर माझा अात्मविश्वास दुणावला. उत्साहपूर्ण वातावरणामुळे मला सराव करताना काेणत्याही प्रकारचा थकवा जाणवला नाही. त्यामुळे मी निरंतरपणे शारीरिक अाणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहिली. यातील सातत्यपूर्व कामगिरीमुळे मला स्पर्धेत यश संपादन करता अाले. याशिवाय मी फिटनेस कायम ठेवण्यासाठी सरावाशिवाय अाहारावरही अधिक भर दिला. याचा निश्चितपणे चांगला फायदा झाला, ’ असेही क्लेटन यांनी सांगितले.

याशिवाय मला घरच्यांचेही माेठे पाठबळ मिळाले. त्यामुळे माझा स्पर्धांमधील सहभाग निश्चितपणे वाढला. अाता अागामी स्पर्धेतही सरस कामगिरी करण्याचा विश्वास अाहे. वयाच्या ७० व्या वर्षी केलेल्या पुनरागमनाचा मला अभिमान अाहे. कारण मी केलेल्या निर्धारामुळे अनेकांना प्राेत्साहन मिळाले अाहे, असेही त्या म्हणाल्या.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मेरी क्लेटनचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...