आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boxing Champion Mary Kom Breaks Down At Public Event, Alleges Regional Bias Against Her

जाहीर कार्यक्रमात ढसाढसा रडली मेरीकोम; सिलेक्टर्सवर लावले गंभीर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमातच मेरीकोमला रडू कोसळले. - Divya Marathi
कार्यक्रमातच मेरीकोमला रडू कोसळले.
मुंबई - भारतीय निवड समिती सिलेक्शन आणि ट्रायल्समध्‍ये प्रादेशिक अस्‍म‍ितेवरून मतभेद करते, असा गंभीर आरोप कांस्‍यपदक विजेती बॉक्‍सर एम. सी. मेरीकोम गुरुवारी एका कार्यक्रमात केला. एवढेच नाही तर त्‍यावरून ती ढसाढसा रडली. मेरीकोम पत्रकारांना म्‍हणाली, ''या पक्षपाती धोरणामुळे मी निराश होते. अनेक वेळा रेफरी आणि पंच मुद्दाहून माझ्याविरोधात निर्णय देतात. मी देशाच्‍या पूर्व भागात राहते. मात्र, एक सच्‍ची भारतीय नागरिक आहे. मी कित्‍येत वेळा हरवलेल्‍या हरियाणाच्‍या पिंकी जांगडा हिचीच बाजू निवड समितीकडून घेतली जाते, '' असा आरोप तिने केला.
'स्‍वत:ला सिद्ध करण्‍यास तयार'
मेरीकोम म्‍हणाली, ''पिंकी जांगडाच्‍या नव्‍हे तर आपल्‍या गटातील कुठल्‍याही भारतीय महिला खेळाडूसमोर स्‍वत:ला सिद्ध करण्‍यास मी कायम तयार आहे.''

वर्ष 2014 मध्‍ये झालेल्‍या कॉमनवेल्थ स्‍पर्धेत मेरीकॉमची निवड केली नव्‍हती. त्‍यांच्‍या ऐवजी जांगडा हिला टीममध्‍ये घेतले होते. जांगडा हिने कॉमनवेल्थपूर्वी 51 किलो ग्रॅम वजन गटातून ट्रायल्समध्‍ये मेरी कॉमला पराजित केले होते. मात्र, यात पंचांनी चुकीचा निर्णय दिला असा आरोप मेरी कॉमने केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...