आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलचे युवा उपांत्य फेरीसाठी उत्सुक; जर्मनीविरुद्ध अाज तगडा सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- अाफ्रिका कपमधील चॅम्पियन माली अाणि इंग्लंडच्या युवांनी सनसनाटी विजयाच्या बळावर शनिवारी फिफाच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गत २०१५ च्या उपविजेत्या माली संघाने अंतिम अाठमधील सामन्यात दाेन वेळच्या विश्वविजेत्या घानाला किकअाऊट केले. माली युवांनी २-१ अशा फरकाने अंतिम अाठचा सामना जिंकला. ड्रामे (१५ वा मि.) अाणि ट्राेअरे (६१ वा मि.) यांनी प्रत्येकी एक शानदार गाेल करून मालीला राेमहर्षक विजय मिळवून दिला. यासह मालीच्या युवांनी अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. माेहंमदने सामन्याच्या ७० व्या मिनिटाला घानाकडून एकमेव गाेल केला. मात्र, या टीमचा सामन्यातील बराेबरीचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे पराभवाने घानाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.   अाता मालीचा स्पर्धेतील उपांत्य सामना २५ अाॅक्टाेबर राेजी मुंबईच्या  मैदानावर हाेणार अाहे.   

मालीने दमदार सुरुवात करताना अवघ्या १५ मिनिटांत सामन्यावर मजबूत पकड घेतली. ड्रामेने गाेलचे खाते उघडून मालीला १-० ने अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये ट्राेअरेने गाेल करून मालीची २-० ने अाघाडी मजबूत केली. दाेन वेळच्या चॅम्पियन घानाला सामन्यात गाेलचे खाते उघडण्यासाठी ७० मिनिटे झुंज द्यावी लागली. मात्र, त्यानंतर घानाच्या युवांना शेवटपर्यंत सामन्यात दुसरा गाेल करता अाला नाही. 

माली युवांचा अात्मविश्वास  झाला द्विगुणित 
दाेन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन घानाचा पराभव केल्याने अाता मालीच्या युवांचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. यामुळे अाता हीच विजयाची लय अागामी सामन्यातही कायम ठेवण्याचा माली टीमचा प्रयत्न असेल. या  विजयामुळे मालीकडून पुढील सामन्यातही सरस खेळीची अाशा अाहे.

घाना युवांची २००७ नंतर सुमार कामगिरी   
दाेन वेळच्या विश्वविजेत्या घाना टीमच्या युवांची कामगिरी सातत्याने घसरत अाहे. याच सुमार खेळीमुळे घानाला सातत्याने अपयशाला  सामाेरेे जावे लागत अाहे. अाताही भारतातील वर्ल्डकपमध्ये घानाच्या युवांना  सुमार खेळीचा माेठा फटका बसला. 

ब्रेवस्टरच्या हॅट््ट्रिकने इंग्लंड सेमीफायनलमध्ये
रिहान ब्रेवस्टरने (११, १४, ९०+६ वा मि.) गाेलची हॅट््ट्रिक करून इंग्लंडला फिफा वर्ल्डकपच्या सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिले. या गाेलच्या बळावर इंग्लंडच्या युवा टीमने शनिवारी उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेचा पराभव केला. इंग्लंडने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला. इंग्लंडच्या विजयात माॅर्गन व्हाइटने (६४ वा मि.) एकमेव गाेलचे याेगदान दिले. तसेच अमेरिकेसाठी जाेशुअाने (७२ वा मि.) गाेल केला. मात्र, अमेरिकेला अापला पराभव टाळता अाला नाही. पराभवामुळे अमेरिकेचे युवा खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले. 

ब्राझीलचा जर्मनीविरुद्ध अाज तगडा सामना
तीन वेळच्या चॅम्पियन ब्राझीलच्या युवांची नजर अाता फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरी प्रवेशाकडे लागली अाहे. यासाठी ब्राझीलचा युवा संघ उत्सुक अाहे. शनिवारपासून वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. अाता रविवारी ब्राझील अाणि जर्मनी यांच्यात सामना रंगणार अाहे. या सामन्यातील विजेत्याला पुढची फेरी गाठून सेमीफायनलमधील अापला प्रवेश निश्चित करण्याची संधी अाहे. त्यासाठी दाेन्ही टीमच्या युवांनी कंबर कसली अाहे. ब्राझीलचे युवा खेळाडू चाैथा किताब जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर सरस खेळी करत अाहेत. या किताबापासून ब्राझील तीन पावलांवर अाहे.

उपविजेत्या स्पेनसमाेर इराण टीमचे अाव्हान
येथील मैदानावर स्पेनचे युवा खेळाडू अंतिम अाठच्या सामन्यात रविवारी इराणच्या अाव्हानाला सामाेरे जातील. त्यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार अाहे. या सामन्यातील विजयासाठी दाेन्ही युवा खेळाडूंनी कसून सराव केला. यातून हा सामना राेमांचक हाेण्याचे चित्र अाहे. स्पेनच्या युवांना स्पर्धेत पुढची फेरी गाठण्याचा विश्वास अाहे. मात्र, इराणची टीम सामन्याला कलाटणी देण्यात तरबेज अाहे.  स्पेनच्या टीमला सामन्यात सावध खेळी करावी लागेल. यातून या टीमचे सामन्यातील विजयाचे डावपेच यशस्वी हाेतील.  इराणच्या टीमला यंदाच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीचा विश्वास  अाहे. 
बातम्या आणखी आहेत...