आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जेइला मागे टाकून मॅकलियाेड चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जमैकाचा युसेन बाेल्ट हा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्यात अपयशी ठरला. ताे १०० मीटरमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे हे भरवशाचे सुवर्ण हुकल्याने जमैकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, बाेल्टच्या याच साेनेरी यशाची उणीव अाता मॅकलियाेडने सुवर्णपदकाने भरून काढली. त्याने चार दिवसांनंतर जमैकालासुवर्णपदकाचा पहिला बहुमान मिळवून दिला.  

३२ वर्षीय धावपटू मॅकलियाेडने पुरुषांच्या १०० मीटर अडथळा (हर्डल्स)    शर्यतीचे अंतर १३.०४ सेकंदांमध्ये पूर्ण केले. 
 
भारतीय धावपटूंची निराशा
भारताच्या महिला धावपटूंना स्पर्धेत झुंज देऊनही निराशेला समाेरे जावे लागले. हरियाणाची धावपटू निर्मला देवी  महिलांच्या ४०० मीटरच्या सेमीफायनलमध्ये सातव्या स्थानावर राहिली. स्वप्नाने १०० मीटर अडथळा शर्यतीत निराशा केली. 

बाेल्ट, थाॅम्पसनच्या अपयशानंतर सुवर्ण
१०० मीटरमध्ये चॅम्पियन म्हणुन बाेल्ट व थाॅम्पसनने  अधिराज्य गाजवले. यंदा जमैकाचे हे दाेघे अपयशी ठरले. बाेल्ट तिसऱ्या व थाॅम्पसन महिलात पाचव्या स्थानी राहिली. त्यानंतर अाेमर मॅकलियाेडच्या रूपाने अाता जमैकाची स्पर्धेतील साेनेरी पहाट उगवली अाहे.  
बातम्या आणखी आहेत...