आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Meet Brazilian Bodybuilder Who Risks His Life Injecting Oil & Alcohol Into His Arms

अशी बॉडी तुम्ही कधी पाहिलीय काय? असे केले त्याने स्वप्न साकार, वाचा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 वर्षीय ब्राझीलियन तरूण रोमारिओ दोस सॅंन्टोस अलव्हेस - Divya Marathi
26 वर्षीय ब्राझीलियन तरूण रोमारिओ दोस सॅंन्टोस अलव्हेस
ब्राझीलमधील रोमारिओ दोस सॅंन्टोस अलव्हेस या 26 तरूणाला एका वेगळ्याच गोष्टीने झपाटले होते. त्याला जगातील सर्वात मजबूत बायशेप बनवायचे होते. यासाठी तो आपल्या दोन्ही हाताच्या दंडात मिनरल ऑईल आणि अल्कोहोलची इंजेक्शन घेऊ लागला. नऊ महिन्यातच त्याला खूप जबरदस्त फरक दिसू लागला. आणखी मोठे बायशेप बनवायचे या ध्येयाने त्याला पछाडले. तो आता शरीरात स्टेरॉईडसह ड्रग्जही घेऊ लागला. अखेर त्याचे 25 इंचाचे बायशेप झाले. बायशेप बनविताना आपला मृत्यू झाला तर बेहत्तर अशी त्याची धारणा झाली होती. मात्र, त्याला मुलगा होताच त्याने मुलगा व पत्नीसाठी जगायचे ठरवले व इंजेक्शन घेणे बंद केले. वाचा, या ध्येयवेड्या ब्राझीलियन तरूणाची कथा...
- रोमारिओ दोस सॅंन्टोस अलव्हेस हा ब्राझीलमधील ग्रामीण भागातून शहरात राहायला आला.
- त्याला लहानपणापासूनच बॉडी बिल्डरचे वेड होते. त्यामुळे शहरात येताच जीममध्ये जाऊ लागला.
- तेथे त्याला खूप मोठे मोठे बॉडी बिल्डर दिसायचे. त्यांच्याप्रमाणेच आपलीही बॉडी झालीच पाहिजे या ध्येयाने त्याला पछाडले.
- ज्यांचे शरीर बलदंड आहे अशा बॉडी बिल्डरला भेटून तो त्यांच्याकडून सल्ले घ्यायचा.
- यातच त्याला कोणीतरी मिनरल ऑईल आणि अल्कोहोलचा फंडा सांगितला. मात्र ते घेणे खूप धोकादायक आहे व त्यात जीवही जावू शकतो असे सांगितले.
- मात्र, त्याला जीवाची फिकीर नव्हती आपला मृत्यू झाला तरी चालेल असे सांगून त्याने सलग नऊ महिने ऑईल व अल्कोहोलची इंजिक्शने घेतली.
- त्याची बॉडी बनू लागली. मात्र त्याच्या बॉडीचे रहस्य काय याची चर्चा होऊ लागली. अखेर त्याचे गुपित बाहेर आले.
कामावरून काढून टाकले तरी याचे उद्योग सुरुच-
- धोकादायक व बेजबाबदार गोष्टी करू लागल्यामुळे तो जेथे काम करीत होता तेथून त्याची हकालपट्टी झाली. तरीही त्याला फरक पडत नव्हता.
- आता त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसून येऊ लागला. डॉक्टरांनी हे बंद केले नाही तर किडणी व लिव्हर लवकरच खराब होऊन मृत्यू होईल असे बजावले. तरीही त्याचे हे उद्योग सुरुच राहिले.
- पत्नीनेही त्याला सोडून देईन अशी धमकी दिली तरीही तो तिला जुमानत नव्हता. अखेर त्याची पत्नी गरोदर राहिली.
- त्याला मुलगा होणार आहे हे समजल्यावर व पत्नी सहा महिन्याची गरोदर असताना त्याने इंजेक्शने घेणे बंद केले.
- मात्र लहानपणी कधीकाळी पाहिलेले जबरदस्त बॉडीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे तो सांगतो.
- आता तो मुलगा व पत्नीसमवेत गुण्यागोविंदाने राहत आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ब्राझीलियन तरूण रोमारिओ दोस सॅंन्टोस अलव्हेसचे जबरदस्त फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...