आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे देशातील पहिली महिला सुमो पैलवान, पुरुषांनाच देते टक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत राहणारी हेतल दुवे भारतातील पहिली महिला सुमो पैलवान आहे. - Divya Marathi
मुंबईत राहणारी हेतल दुवे भारतातील पहिली महिला सुमो पैलवान आहे.
मुंबई- ऑलिंपिकच्या आधीच डोपिंगच्या वादाने भारतीय कुस्ती वादात आहे. कुस्तीतील आणखी एक रूप म्हणजे 'सूमो पैलवान'. यात पुरुषाची मक्तेदारी तोडून आपल्या देशाचे नाव एका तरूणीने उज्ज्वल केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय देशातील पहिली महिला सूमो पैलवान हेतल दवेबाबत. देशातील पहिल्या महिला सुमो फायटर असलेली हेतलला सहकारी महिला पैलवान मिळत नसल्याने तिला बिचारीला पुरुषांशीच भिडावे लागले. लिम्का बुक ऑफ रिकार्ड्समध्ये आहे नाव...
- मुंबईत राहणारी 27 वर्षीय सूमो पैलवान हेतल दवेने 2009 मध्ये तैवानमध्ये झालेल्या विश्व सूमो कुस्ती स्पर्धेत 5 वे स्थान मिळवले होते.
- भारताची पहिली महिला सुमो पैलवान म्हणून हेतलचे नाव लिम्का बुक ऑफ रिकार्ड्समध्ये नोंदले गेले आहे.
- 5.6 फूट उंचीच्या हेतलचे वजन सुमारे 76 किलो आहे. ती सूमो कुस्तीच्या 65-85 किलो गटात सहभाग घेते.
- हेतल सूमो कुस्ती शिकविण्यासोबतच विद्यार्थ्यांना कुस्ती आणि ज्युडोचे प्रशिक्षण देते.
- भारतात महिला सुमो खेळाडू नसल्याने तिला पुरुष सुमो खेळाडूंसोबत ट्रेनिंग घ्यावे लागते.
- महिला सुमो पैलवान नसल्याने तिला मजबुरीने भाऊ अक्षयसोबत कुस्ती करावी लागते जो ज्युडो खेळाडू आहे.
- प्रॅक्टिससाठी रिंगची कमी असल्याने ती आपल्या घरातच लॉनमध्ये ट्रेनिंग घेते.
- हेतल संपूर्णपणे शाकाहारी आहे आणि प्रोटीनयुक्त पालेभाज्या व फळांचा आहार घेते.
सुमो पैलवानकीला नातेवाईकांचा विरोध-
- हेतलने भारताचे पोलँड, एस्टोनिया, तैवान आणि जापानमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
- एका ब्राह्मण परिवारात जन्म घेऊन सुद्धा हेतलला सुरुवातीला नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागला.
- हेतल 6 वर्षाची असतानाच ज्युडोचे शिक्षण घेऊ लागली. जशी जशी मोठी होऊ लागली तस तसे तिला सुमोची आवड लागली.
- हेतलच्या वडिलांना तिच्या लग्नाची चिंता असायची.
देशात मान्यता नाही सुमो पैलवानकीला...
- भारतात सूमो कुस्तीला मान्यता प्राप्त खेळाचा दर्जा नाही. त्यामुळे हेतलला अनेक स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करता येत नाही.
- प्रायोजक मिळत नसल्याने हेतलला विदेशात होणा-या स्पर्धांत भाग घेता येत नाही.
- तिला सूमो कुस्तीत करिअर करण्याची इच्छा असतानाही भारतातील सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे तिला समस्येचा सामना करावा लागत आहे.
- आवड व छंदामुळे घरातील परिवारांकडून जेवढी आर्थिक मदत होते त्यातूनच ती स्पर्धेला जाते. देशात हा खेळ रूजावा अशी तिची मनोमन इच्छा आहे.
- हेतलला अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारताची पहिली महिला सुमो पैलवान हेतल दवेचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...