आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८ फूट १ इंचाचा मुर्तझा सर्वात उंच, रिअाे पॅरालिम्पिकमध्ये इराणला मिळवून दिले विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिअाे - सध्या इराणच्या सीटिंग व्हाॅलीबाॅल संघाने रिअाे पॅरालिम्पिक स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला अाहे. सलगच्या एकतर्फी विजयाच्या बळावर या संघाने स्पर्धेतील अापला किताब जिंकण्याचा दावाही मजबूत केला. इराणच्या सलगच्या विजयाचे श्रेय मुर्तझा मेहरजादला जाते. कारण २८ वर्षीय या खेळाडूची उंची ८ फूट १ इंच अाहे. याच उंचीच्या बळावर ताे अातापर्यंत अापल्या टीमच्या विजयात माेलाचे याेगदान देऊ शकला. ताे जगातील दुसरा सर्वात उंच व अांतरराष्ट्रीय स्तरावरचा काेणत्याही खेळातला उंच खेळाडू अाहे. तुर्कीचा सुलतान काेसेन हा सर्वात उंच अाहे. त्याची ८ फूट २ इंचांची उंची अाहे.

१५ व्या वर्षी सायकल अपघातामुळे मुर्तझाच्या डाव्या पायाचा विकास खुंटला. त्यामुळे त्याच्या उजव्या व डाव्या पायाच्या अंतरात ६ इंचांचा फरक जाणवू लागला. यामुळे त्याला अाधाराशिवाय चालता येत नव्हते. गरिबीमुळे त्याने उपचार केला नाही.
अाजारामुळे वाढली उंची
मुर्तझा हा एक्राेमिगेली या अाजाराने त्रस्त अाहे. अशा प्रकारचा अाजार असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील ग्राेथ हार्माेन्सची संख्या ही सर्वसामान्यांपेक्षा अधिक असते. याच कारणामुळे मुर्तझाची उंची वाढतच अाहे. मात्र, या अाजाराने बाधित असलेल्या व्यक्ती फार काळ जगत नाहीत. त्या अल्पायुषी असतात. असे असतानाही मुर्तझाने खेळात यश मिळवले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मुर्तझाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...