आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'दबंग दिल्‍ली\' टीमची मालक राधा कपूरविषयी जाणून घ्‍या काही खास बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधा कपूर. - Divya Marathi
राधा कपूर.
दुसरा प्रो- कबड्डी सिजन 18 जुलैरोजी सुरू होणार असून सर्व टीम आणि मालक सज्‍ज झाले आहेत. या स्‍पर्धेच्‍या आठ टीम मालकांमध्‍ये राधा कपूर ही एकटी महिला आहे. राधा कपूर ही 'दबंग दिल्‍ली' या टीमची मालक आहे. यंदाच्‍या सिजनमध्‍ये पहिला सामना 19 जुलैरोजी मुंबर्इमध्‍ये होणार आहे. divyamarathi.com वर जाणून घ्‍या उद्योजक कुटूंबातील राधा कपूरच्‍या जीवनाशी जुळलेल्‍या काही खास बाबी.
>राधा कपूरने मुंबईनंतर न्‍युयॉर्कच्‍या पार्सन्‍स स्‍कूल ऑफ डिझाईनमध्‍ये फाईन आर्ट या पदवीचे शिक्षण घेतले. येथूनच कम्‍युनिकेशन डिझाईनमध्‍ये तिने मास्‍टर डिग्री मिळवली.
>राधा ही यस बँकचे प्रमुख राणा कपूर यांची मुलगी असून तिने वडिलांच्‍या बिझनेसमधून बाहेर होऊन, ‘डू इट क्रिएशंस’ नावाची कंपनी सुरू केली.
>राधाच्‍या कंपनीने स्‍पॅनिश कंपनीच्‍या सहकार्याने भारतात पहिल्‍यांदा ड्राय क्‍लिनिंग सर्व्‍हिस सुरू केली. याशिवाय कला क्षेत्रातही ती अॅक्टिव्ह आहे.
>टाटा हाऊसिंग, इंडिया बुल्‍स, बरिस्‍टा, ली यांसारख्या कंपन्‍या राधा कपूरच्‍या कंपनीच्‍या क्‍लाइंट आहेत.
> 2014 मध्‍ये कबड्डी टीम विकत घेऊन राधा कपूरने पहिल्‍यांदा स्पोर्ट्समध्‍ये गुंतवणूक केली.
> त्‍यानंतर हॉकी इंडिया लिगमध्‍येही तिने एक टीम खरेदी केली.
> राधाच्‍या आईचे नाव बिंदू कपूर आहे. राखी कपूर टंडन आणि रोशनी कपूर या तिच्‍या छोट्या बहिणी आहेत.
या आहेत रंजक
> राधा कपूर शालेय दिवसांमध्‍ये कबड्डी खेळलेली आहे.
> राधाची वुमंस कबड्डी लिग सुरू करण्‍याची इच्‍छा आहे.
> राधा योगाला महत्‍त्व देते. आपल्‍या टीममधील खेळाडूंना ती याबाबत प्रोत्‍साहित करते.
> राधाने पेंटिंग, पियानो आणि क्‍लासिकल नृत्‍याचे धडे घेतलेले आहेत.
> 7 वर्ष भरतनाट्यम शिकल्‍यानंतर तिने मुंबई आणि दिल्‍लीमध्‍ये स्‍टेज शो केले आहेत.
पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा 'दबंग दिल्‍ली'ची मालक राधा कपूरचे ग्‍लॅमरस फोटो..