लिंकन (अमेरिका) - आधी तिचे वजन १०१ किलो होते. ती स्वत:चे कामही नीट करू शकत नव्हती. एकदा ती नवऱ्यासोबत सुट्यांत कोर्नवालला गेली. तेथे तिला डोंगरावर चढायचे होते. मात्र, आपल्या वजनामुळे ती चढू शकली नाही. नवऱ्याला गाडी आणण्यासाठी सांगावे लागले. त्याच वेळी तिने आपले वजन कमी करण्याचे ठरवले. तिने ३५ किलो वजन कमी केले...ही कथा आहे मिशेल फ्रँकलिनची. आता ती बेंच प्रेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहे, हे एेकून कुणालाही धक्का बसेल.
११ महिन्यांची नात इजीची आजी ५० वर्षीय मिशेल आधी मुळीच व्यायाम करीत नव्हती. नेहमी काही ना काही खातच असे. यामुळे तिचे वजन गरजेपेक्षा अधिक वाढले. ती प्रोफेशनल डॉग वॉकर आहे. तिला कुत्रे फिरवण्याचा छंद आहे. मिशेल म्हणते, "वजन कमी करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक काम होते. सुरुवात कुठून करावी, हे मला माहीत नव्हते. यानंतर मी स्वत:च व्यायामाला सुरुवात केली. मी हाय इंटेसिटी एक्सरसाइज सुरू केली. मात्र, मला काही सकारात्मक इफेक्ट दिसत नव्हते. मी एका जिमहून दुसऱ्या जिमला जात होते. मी त्रस्त झाले होते. यानंतर एखाद्या प्रोफेशनलची मदत घेण्याचे मी ठरवले. यामुळे वजन कमी करण्यासोबत न्यूट्रिशन आणि आहाराचेही मार्गदर्शन मिळेल, असे वाटले. माझी भेट रेयान ग्रिफिथशी झाली. त्यांनी मला पर्सनल ट्रेनर म्हणून मदत करण्यास सुरुवात केली. रेयानने माझ्या जीवनात सकारात्मकता आणली. त्यांनी मला नेहमी प्रेरित केले. त्यांनी माझ्या व्यायामाचे आणि आहाराचे वेळापत्रक केले. यानंतर मी ते वेळापत्रक कठोरपणे पाळले,' असेही ती म्हणाली. मिशेलचे ट्रेनर रेयान म्हणाले, "मी पहिल्यांदा मिशेलला भेटलो तेव्हा ती वजन कमी करण्यासाठी खूप कटिबद्ध होती. तिच्यात जबरदस्त आत्मविश्वास होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...