आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅसी दुस-यांदा बनला बाप, तरीही केले नाही या मॉडेल गर्लफ्रेंडसोबत लग्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलोना- एफसी बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लियोनेल मॅसी आता दुस-यांदा बाप बनला आहे. त्‍याची गर्लफ्रेंड अँटोनेला रोकुजोने शुक्रवारी एका खाजगी हॉस्पिटलमध्‍ये दुस-या मुलाला जन्‍म दिला आहे. मॅसीचा भाऊ मेटियासने ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे. या मुलाचे नाव मेटियो ठेवण्‍यात आले आहे. 28 वर्षीय मॅसी मुलाच्‍या जन्‍मामुळे शुक्रवारी सराव सत्रातही पोहचू शकला नाही.
मॅसी आणि अँटोनेला अजूनही लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये राहतात. मॅसीचा पहिला मुलगा थियागो याचा जन्‍म 2012 मध्‍ये झाला होता, तरीही या जोडप्‍याने लग्‍न केले नाही. गर्लफ्रेंड गर्भवती असल्‍यानंतर कपल लग्‍न करून घेण्‍याच्‍या तयारीत असतात. मात्र, मॅसीने तसे काही केले नाही.
फुटबॉलरसाठी सोडले करियर
अँटोनेलाचा मॅसीसोबत संबंध येण्‍याआधी ती मॉडेलिंग करत होती. मॅसीने या अफेयरला स्‍वीकारल्‍यानंतर तिने करियर सोडून दिले. या संदर्भात तिचे मत आहे, 'मॅसी पेक्षा अधिक महत्‍त्‍वाचे तिच्‍या आयुष्‍यात काही नाही. त्‍यामुळे ती पूर्ण वेळ त्‍याच्‍यासाठी आणि घरासाठी देणार आहे.'
एका मुलाखतीत केला हा खुलासा
2009 मध्‍ये लियोनेल मॅसी आणि मशहूर मॉडेल लुसियाना सेलाजेर यांच्‍यात अफेयर असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले होते. दरम्‍यान एका रेडिओला मुलाखत देताना, मॅसीने अर्जेंटीनामध्‍ये त्‍याची गर्लफ्रेंड असल्‍याचा खुलासा केला होता. पुढे काही दिवसानंतर तो अँटोनेलासोबत सुट्यांचा आनंद घेताना दिसला.
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, अँटोनेला आणि मॅसी यांचे खास फोटो..