आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड, लग्नाशिवाय मुले, घर-कार; काही अशी आहे मेस्सीची LIFESTYLE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईस्ट परदफोर्ड - जगातील अव्वल फुटबॉलर्सपैकी एक असलेला अर्जेंटिनाचा ऑल टाइम टॉप गोल स्कोरर लियोनेल मेस्सीने सोमवारी आंतरराष्ट३ीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. कोपा अमेरिका स्पर्धेच्या फायनलमध्ये चिलीकडून पेनॉल्टी शूटआऊटमध्ये झालेल्या पराभवाने तो निराश होता. या मॅचमध्ये मेस्सी पेनॉल्टी गोल करण्यात अपयशी ठरला होता.

कशी आहे मेस्सीची लाइफस्टाइल
> सर्वसामान्य अंगयष्टीच्या लियोनल मेस्सीला पेले आणि मेरेडोनाच्या तोडीचा फुटबॉलर मानले जात होते.
> मेस्सीचे नाव त्याच्या गर्लफ्रेंडशिवाय इतर कोणत्याही मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीमध्ये जोडले गेले नाही.
> दोन मुले झाल्यानंतरही तो लग्नाशिवाय गर्लफ्रेंड अँटोनेला रोकुजो सोबत राहातो.
> अँटोनेला आणि मेस्सी यांना दोन मुले आहेत. मोठ्याचे नाव थियागो (2012 मध्ये त्याचा जन्म झाला) आणि लहाना आहे मेटियो (2015) आहे.
मेस्सीसाठी सोडले करिअर
> मेस्सीची गर्लफ्रेंड अँटोनेला हिने मेस्सीसाठी करिअरवर पाणी सोडले आहे.
> मेस्सीला भेटण्यापूर्वी अँटोनेला मॉडेलिंग करत होती. जेव्हा मेस्सीने अँटोनेलासोबतचे अफेअर मान्य केले तेव्हा तिने करिअर सोडले होते.
> करिअर सोडण्याचे कारण विचारल्यानंतर अँटोनेलाचे उत्तर होते, की प्रेम आणि घर हे आता माझ्यासाठी सर्वस्व आहे. मेस्सीपेक्षा महत्त्वाचे माझ्या आयुष्यात काहीच नाही.
रेडिओवर सांगितली होती लव्हस्टोरी
> 2009 मध्ये लियोनेल मेस्सी आणि प्रसिद्ध मॉडेल लुसियाना सेलाजेर यांच्यातील अफेअरची जोरदार चर्चा होती.
> त्या दरम्यान एका रेडिओ चॅनलला दिलेल्या इंटरव्हमध्ये मेस्सीने गर्लफ्रेंड ही अर्जेंटिनाचीच असेल असे ठाम पणे सांगून लुसियानासोबतच्या अफेअरवर पडदा टाकला होता.
> या खुलाशानंतर काही दिवसांतच मेस्सी अँटोनेलासोबत दिसला होता.
> यावर्षी एका मॅचमध्ये हॅट्रिक गोल केल्यानंतर मेस्सीने टी-शर्टमध्ये बॉल ठेवून जल्लोष केला होता.
> त्याचा अर्थ असा होता, की अंटोलिना प्रेग्नेंट आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा,
> फुटबॉल ग्राऊंडसारखे दिसते घर
> मेस्सीच्या ताफ्यात कोणत्या कार
> मेस्सीचा स्टायलिश लूक आणि पर्सनल लाइफचे खास फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...