आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेसीने केला ३०० वा गोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेसीने ला लीगाच्या सामन्यात एकूण ३०० वा गोल करण्याचा पराक्रम केला आहे. बार्सिलोनाच्या स्पोर्टिंग गिजोनविरुद्ध विजयात मेसीने दोन गोल करून सामना गाजवला. चॅम्पियन्स लीगच्या या सामन्यात बार्सिलोनाने गिजोनवर ३-१ ने विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोना गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. बार्सिलोनाचे आता २४ गुण सामन्यांत ६० गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अॅथलेटिको माद्रिद बार्सिलोनाच्या तुलनेत ६ गुणांनी मागे आहे, तर क्रिस्टियानो रोनाल्डोची रिअल माद्रिद टीम बार्सिलोनाहून ७ गुणांनी मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला मेसीने गोल केला. हा ला लीगामध्ये त्याचा ३०० वा गोल ठरला. मेसीचा हा ३३४ वा ला लीगाचा सामना होता. त्याच्या नावे आता एकूण ३०१ गोल झाले आहेत.