आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५००० काेटींचा मालक शुमाकरच्या उपचारावर १०० काेटींचा खर्च, जेट-बंगल्यांची केली विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनेव्हा- फाॅर्म्युला-वनरेसर मायकेल शुमाकरच्या प्रकृतीमध्ये अद्याप काेणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. त्यामुळे ताे तीन वर्षांपासून अंथरुणावर खिळून पडलेला अाहे. त्याच्या
उपचारावर हाेणाऱ्या खर्चामुळे कुटुंबीय अार्थिक अडचणीत सापडले अाहेत.
एका अाॅस्ट्रेलियन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ५३४६ काेटींच्या संपत्तीचा
मालक शुमाकरच्या कुटुंबीयांची अार्थिक स्थिती अाता हलाखीची झाली अाहे. त्याच्या
उपचारावर हाेणाऱ्या खर्चासाठी घरच्यांना प्रायव्हेट जेट, बंगल्यासह काही गाेष्टींची
विक्री करावी लागली. कारण अातापर्यंत त्याच्यावर १०० काेटी रुपये खर्च झाले अ
ाहेत. त्याच्या इलाजासाठी अाठवड्याला एका काेटीपेक्षा अधिक खर्च लागत अाहे.
त्याच्यावर घरीच उपचार सुरू अाहेत. त्यामुळे त्याच्या देखभालीसाठी नर्स, तज्ज्ञ
वैद्यकीय पथक, त्यांचे मानधन, अाैषधीसह इतरांवर अातापर्यंत १०० काेटींचा खर्च
झालेला अाहे. तीन वर्षांत हा खर्च झाला अाहे. त्याचे सारे काही बिझनेस हे पत्नी
काेरिनाच पाहते.
सात वेळचा वर्ल्ड चॅम्पियन शुमाकरला डिसेंबर २०१३ मध्ये स्कीइंग करताना अपघात
झाला हाेता. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती. त्यानंतर ताे सहा
महिने काेमात हाेता. दरम्यान, त्याच्यावर फ्रान्समध्ये उपचार करण्यात आले. मात्र,
अाता त्याला जिनेव्हात दाखल करण्यात अाले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू
अाहेत. त्याच्यावर नियमितपणे उपचार सुरू अाहेत. मात्र, त्याच्या प्रकृतीत अद्याप
काेणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अाता त्याचे वजन ४५ किलाेवर येऊन
पाेहोचले अाहे. त्याला नळीतूनच अन्न साेडले जात अाहे. मध्यंतरी त्याच्या
प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे वृत्त हाेते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून
लावले. कारण मागील तीन वर्षांपासून त्याची प्रकृती जैसे थे अाहे.
बातम्या आणखी आहेत...