आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकमध्ये 23 सुवर्णपदके पटकावणाऱ्या मायकेल फेल्प्सची समुद्रात व्हाइट शार्कशी स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेल्प्सने व्हाइट शार्कसोबत सरावाची छायाचित्रे शेअर केली. - Divya Marathi
फेल्प्सने व्हाइट शार्कसोबत सरावाची छायाचित्रे शेअर केली.
वॉशिंग्टन - जगातील सर्वात वेगवान व यशस्वी जलतरणपटू म्हटले की  मायकेल फेल्प्सचे आणि समुद्रात सर्वात वेगवान आणि धोकादायक मासा म्हटले की व्हाइट शार्कचे नाव येते. हे दोघे आता समुद्रात परस्परांविरुद्ध स्पर्धेत उतरतील. ऐकायला हे थोडे विचित्र वाटत असले तरी प्रत्यक्षात हा सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. एखाद्या माणसाची थेट माशाशी होत असलेली ही पहिली स्पर्धा २३ जुलै रोजी डिस्कव्हरी वाहिनीवर दाखवली जाणार आहे.
 
फेल्प्ससुद्धा या सामन्यासाठी उत्सुक आणि उतावळा आहे. गेल्या आठवड्यात त्याने एका पिंजऱ्यात बंद होऊन हा सराव केला. याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. तो या पोस्टमध्ये म्हणतो, ‘मला मनापासून जी इच्छा होती ती मी आता पूर्ण करू शकेन. मी पिंजऱ्यात राहून आता व्हाइट शार्कसोबत पोहेन.’ तज्ज्ञांच्या मते ग्रेट व्हाइट शार्कचा पोहण्याचा साधारण वेग ताशी ५ मैल असतो. मात्र, जेव्हा तो हल्ल्याच्या तयारीत असतो तेव्हा हा वेग ताशी २५ मैल होतो. एका अस्सल जलतरणपटूपेक्षा हा वेग सुमारे १० पट असतो. ३१ वर्षीय फेल्प्सने आजवर सर्वाधिक ताशी ६ मैल वेग नोंदवला आहे. त्याच्या या वेगाचे गुपित त्याच्या उंचीमध्ये आहे. त्यामुळे स्पर्धेत शार्कपासून त्याचे अंतर आणि शार्कची बुद्धी यावर बरेच काही अवलंबून असेल. डिस्कव्हरी वाहिनीने याबाबत म्हटले आहे की, ‘जगातील सर्वात यशस्वी अॅथलिट सागरात एका कुशल शिकाऱ्याशी स्पर्धा करेल. शार्क या ग्रहावरील सर्वात वेगवान आणि कुशल शिकारी आहे. तर, फेल्प्स जेव्हा पाण्यात उतरतो तेव्हा तोच चॅम्पियन ठरतो.’ वाहिनीने ‘शार्क वीक’ मालिकेतील या भागाला ‘फेल्प्स व्हर्सेस शार्क, ग्रेट गोल्ड व्हर्सेस ग्रेट व्हाइट’ असे नाव दिले आहे.