आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IRONMAN: मिलिंदने पन्‍नाशीत जिंकली सर्वात आव्‍हानात्‍मक स्‍पर्धा, जाणून घ्‍या ट्रायक्लॉन आयर्नमॅनविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ट्रायक्लॉन आयर्नमॅन’ च्‍यावेळी साइकिलिंग करताना मिलिंद. दुस-या चित्रात आपल्‍या पुरस्‍कारासोबत. - Divya Marathi
‘ट्रायक्लॉन आयर्नमॅन’ च्‍यावेळी साइकिलिंग करताना मिलिंद. दुस-या चित्रात आपल्‍या पुरस्‍कारासोबत.
स्वित्झरलंडमधील झुरीच येथे नुकत्‍याच पार पडलेल्‍या ट्रायक्लॉन आयर्नमॅन स्पर्धेत अभिनेता, मॉडेल आणि धावपटू असलेल्‍या मिलिंद सोमण याने आपले नाव कोरले आहे. विशेष म्‍हणजे जगातील सर्वांत आव्हानामक समजली जाणारी स्‍पर्धा त्‍याने वयाच्‍या पन्‍नाशीत जिंकली आहे.

आयर्नमॅन स्पर्धेमध्‍ये मिलिंद सोमण यंदा पहिल्‍यांदाच सहभागी झाला होता. त्‍याने स्वित्झरलंड येथे ही स्पर्धा 15 तास 19 मिनिटांत पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ पदावर नाव कोरले आहे. विशेष हे की, मिलिंद येणा-या नोव्हेंबर महिन्यात वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहेत. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांने ट्विटरवरून आपला आनंद व्यक्त केला व त्‍याच्‍या चाहत्यांचेही आभारही मानले.
जगातून 2000 स्‍पर्धकांचा सहभाग
जगभरातील २००० स्‍पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्‍ये भारताकडून 7 जण होते. या टीममध्ये मिलिंद सोमण याचा समावेश होता. डॉ. कौस्तुभ राडकर या धावपटूने टीमचे नेतृत्त्व केले. डॉ. राडकर यांनी सलग अकरांव्‍यांदा यंदा ही स्पर्धा जिंकली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून फोटोसह जाणून घ्‍या कशी आहे आयर्नमॅन स्पर्धा..