मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण याने जगातील सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी 'द आयर्न मॅन ट्रायथलॉन' ही स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण केली. पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन टप्यात त्याने बाजी मारली. सुमारे दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची ही शर्यत मिलिंदने वयाच्या पन्नासव्या वर्षी पूर्ण केली. मिलिंदने नुकतेच
आपल्या
ब्लॉगव्दारे 'Why I Run' आपण का धावलो हे स्पष्ट केले आहे. स्पर्धेचे नियोजन का आणि कसे केले. लोकांच्या कशा प्रतिक्रीया मिळाल्या हे त्याने सांगितले आहे.
मिलींद म्हणतो, '19 जुलै रोजी मी माझ्या आयुष्यातील पहिल्या 'द आयर्न मॅन ट्रायथलॉन' या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे व 24 किलोमीटर धावणे हे तीन टप्पे 15 तास 19 मिनिटांमध्ये पूर्ण केले. पन्नासाव्या वर्षी मी ही स्पर्धा यशस्वीरित्या जिंकू शकलो याचा मला आनंद वाटतो.'
'मला या आव्हानात्मक स्पर्धेतील सहभागाबाबत लोकांनी वारंवार विचारले, एवढी सारी आव्हाने पेलण्यासाठी तू का तयार झाला ? या वेदना तू का स्विकारतोस ? पण हेच प्रश्न आपल्याला प्रचंड ऊर्जा देणाऱ्या ठरतात'. असेही तो म्हणतो.
..तेव्हा कोणत्याही वेदना होत नाही
स्पर्धेतील आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी सर्वांगिण सराव आणि इच्छाशक्तीची गरज असते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक शक्ती एकत्र आली, तर कोणत्याही वेदना होत नाहीत. त्याआधारेच पन्नासव्या वर्षी स्पर्धेचे नियोजन करून मला यशस्वी होता आले. सोशल मिडीयावर मला प्रोत्साहन मिळाले, माझे कौतूक केले गेले. आपल्या या आपुलकीमुळेही मी धन्य झालो आहे. असेही मिलिंद म्हणतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, मिलींदची स्पर्धेतील काही फोटो..