आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Montekarlo Masters Tennis: Andy Marry In Semifinal

माेंटेकार्लाे मास्टर्स टेनिस: अँडी मरे सेमीफायनलमध्ये दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेंटेकार्लाे - इंग्लंडचा अव्वल खेळाडू अँडी मरेने शुक्रवारी माेंटेकार्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. दुसऱ्या मानांकित मरेने लढतीत ६-२, ६-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह त्याला अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अशा प्रकारे मरेने अापल्या करिअरमध्ये तिसऱ्यांदा माेंटेकार्लाे मार्स्टसच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पराभवामुळे कॅनडाच्या राअाेनिकचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याने पहिल्या सेटवर मरेला राेखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने दमदार सुरुवातही केली. मात्र, दुसऱ्या मानांकित मरेने सरस खेळी करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. याशिवाय त्याने लढतीत अाघाडी मिळवली. त्यानंतर पिछाडीवर पडलेल्या मिलाेस राअाेनिकला प्रत्युत्तराची एकही संधी मिळाली नाही. याचाच फायदा घेत मरेने दुसरा सेट ६-० ने जिंकून सामना अापल्या नावे केला. यासह त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता अाला.