आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RIO: मोरोक्कोच्या बॉक्सरकडून दोन मेड्सवर बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओत खेळाडूंना राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या क्रीडाग्राममधील एका अपार्टमेंटमधील चेंबरमध्ये मोरोक्कोच्या हसन सादा (डावीकडे) या बॉक्सरने दोन मेड्सवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. - Divya Marathi
रिओत खेळाडूंना राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या क्रीडाग्राममधील एका अपार्टमेंटमधील चेंबरमध्ये मोरोक्कोच्या हसन सादा (डावीकडे) या बॉक्सरने दोन मेड्सवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
रिओ डी जेनेरियो- ऑलिंपिक गेम्सच्या ओपनिंग सेरेमनी आधी क्रीडाग्राममध्ये मोरोक्कोच्या एका बॉक्सरला बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अटक केली. आरोपी बॉक्सरचे नाव हसन सादा आहे. हसनला शनिवारीच आपली पहिली लढत खेळायची आहे. मात्र आता तो ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याबाबत शंका आहे. कोणावर केला बलात्काराचा प्रयत्न...
- हसन सादाला शुक्रवारी सकाळी आपल्या चेंबरमध्ये काम करणा-या दोन मेड्ससोबत बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
- मेड्सनी तक्रार केली असून पोलिसांना सांगितले की, हसनने बुधवारी आमच्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनने दोन्ही मेड्सला आपल्यासोबत फोटो घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्याने त्यांच्यावर बलात्कार करण्य़ाचा प्रयत्न केला.
- हसनला सध्या रिमांडवर घेतले आहे. ज्यामुळे हा 22 वर्षीय आरोपी बॉक्सर शनिवारी होणा-या लढतीत सहभागी होऊ शकणार नाही.
- या प्रकरणाची चौकशी करणारे जज लारिसा न्यून्स सॅलीने आरोपी खेळाड़ूला 15 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
- तसेच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- त्यामुळे ऑलिंपिकमध्ये खेळण्याची हसन सादाची संधी हुकल्याचे बोलले जात आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बलात्काराचा आरोप असलेल्या मोरोक्कोच्या या बॉक्सरचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...