आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉल टाकताना बॉलरच पळाला, वाचा आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील फनी किस्‍से

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल स्पर्धा मध्यावर आली असून रोमांचक वळणावर ही स्पर्धा पोहचली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेनंतर जून-जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये चॅम्पियन ट्राफी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत जगातील प्रमुख क्रिकेट खेळणारे सर्व देश सहभागी होत आहे. भारताने मात्र अद्याप या स्पर्धेसाठी संघ जाहीर केलेला नाही. असे असले तरी सध्या देशात क्रिकेटचा ज्‍वर चढाच आहे. त्‍या अनुषंगाने आम्ही सांगणार आहे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मॅचदरम्‍यान घडलेले मज्‍जेदार किस्‍से....
 
बॉल टाकताना बॉलर पळून गेला-
 
- 1989 मध्‍ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.
- बेंगलुरूच्‍या मैदानावर भारताविरुद्ध कसोटी खेळली जात होती.
- यात न्यूझीलंडचा गोलंदाज चॅटफील्ड हा ओव्‍हर टाकत होता.
- त्‍याने त्‍या ओव्‍हरचा पहिला चेंडू टाकला.
- दुसरा चेंडू टाकण्‍यासाठी त्‍याने रनअप घेतला आणि अम्‍पायर, फलंदाज, विकेट किपर यांना पार करून थेट ड्रेसिंग रुम गाठली.
- सुरुवातीला काय झाले कुणालाच काही कळले नाही.
- हा प्रकार पाहून प्रेक्षही अचंबित झाले होते.
 
का सोडले होते मैदान ?
 
- रात्रीच्‍या जेवणामुळे चॅटफील्ड याची पचनक्रिया खराब झाली होती.
- त्‍याचे पोट गडगडाला लागले.
- प्रेशर वाढल्‍याने तो बॉलिंग टाकता टाकता थेट पळत पळत टॉयलेटमध्‍ये गेला.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, मैदानावर घडलेले इतर मज्‍जेदार किस्‍से...
बातम्या आणखी आहेत...