आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना-सिंधूची आता रुपेरी पडद्यावरही टक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लगान’चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर खेळाडूंच्या जीवनावर आणि क्रीडा क्षेत्रातील यशावर आधारित चित्रपटांची रांगच लागली. ‘बॉक्स ऑफिस’वर प्रचंड गल्ला गोळा करणाऱ्या दंगल (कुस्ती), सुलतान (प्रो.कुस्ती), एम. एस. धोनी (क्रिकेट), मेरी कोम (बॉक्सिंग), भाग मिल्खा भाग (अॅथलेटिक्स-धावपटू) या चित्रपटांनंतर बॅडमिंटनमधील भारतीय सम्राज्ञी सायना नेहवालवरील चित्रपटापाठोपाठ पी. व्ही. सिंधूच्या जीवनावर आधारित चित्रपट येण्याचे संकेत आहेत. त्यानिमित्त बॅडमिंटन कोर्टवर लढणाऱ्या या दोन सम्राज्ञींची रुपेरी पडद्यावरील लढत रंगेल. 
 
लंडन ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन महिला एकेरीच्या कांस्यपदकाने सायना नेहवालला नंतरच्या कालावधीत सुमारे २५ कोटींवर व्यावसायिक लाभ देणारे करार मिळवून दिले. पी. व्ही. सिंधूच्या रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदकांच्या रुपेरी रंगाने सिंधूची ‘मार्केट व्हॅल्यू’ दुप्पट करत तिला ५० कोटींवरचे करार दिले. 
 
सायना-सिंधू यांच्या बॅडमिंटनमधील रोमहर्षक आणि चित्तथरारक चरित्रांवर आधारित व्यक्तिरेखा समर्थपणे उभ्या करण्यासाठीही रस्सीखेच सुरू आहे. पी. व्ही. सिंधूच्या भूमिकेसाठी सध्या दीपिका पदुकोणचे नाव चर्चेत आहे, तर सायनाची भूमिका श्रद्धा कपूर करणार आहे. सिंधूच्या ‘मार्केट व्हॅल्यू’ला दीपिका पदुकोणच्या अभिनयासोबतच माजी राष्ट्रीय खेळाडू म्हणून बॅडमिंटन कौशल्याचीही जोड लाभणार आहे. 
 
दुसरीकडे सिंधूपेक्षा अधिक अनुभवी, लोकप्रिय आणि कारकीर्दीचे अनेक रोमहर्षक पैलू असणाऱ्या जीवनकथेमुळे सायना नेहवालचे पारडे जड मानले जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी सायना नेहवालच्या जीवनावरील चित्रपटाच्या घोषणेपाठोपाठ सोनू सूद यांनी सिंधूच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा केली. अमोल गुप्ते यांनी २०१५ पासून सायनाच्या चित्रपटावर काम सुरू गेले आहे. सायनाचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, जवळचे सहकारी यांच्याशी बोलत आणि तिच्या सामन्याच्या चित्रफिती अभ्यासून, तिचा खेळ प्रत्यक्ष पाहून गुप्ते यांनी कलाकृती बांधण्यास सुरुवात केली. या खेळाडू मधला प्रशिक्षक गोपीचंद हादेखील एक महत्त्वाचा दुवा आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...