आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Only Indian In Forbes List Of World\'s 100 Richest Athletes 2015

फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार श्रीमंत खेळाडुंमध्ये धोनी 23 वा, 197 कोटी कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आणि वन डे संघाचा कर्णधार एम.एस. धोनी जगातील 100 सर्वात श्रीमंत खेळाडुंच्या यादीत असलेला एकमेव भारतीय स्पोर्टस् स्टार आहे. तो या यादीत 23 व्या स्थानी आहे. पुन्हा एकदा अमेरिकेचा बॉक्सर मेवेदर यात टॉपवर आहे. त्याचबरोबर गोल्फ स्टार टायगर वुड्स, टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि फुटबॉलपटू रोनाल्डोचाही समावेश टॉप 10 मध्ये आहे.

क्रिकेटच्या तुलनेत जाहिरातीतून 7 पट अधिक कमाई
फोर्ब्सच्या टॉप 100 खेळाडुंच्या 2015 च्या यादीत धोनीला 23 वे स्थान मिळाले आहे. त्याची एकूण कमाई 31 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 197.98 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार धोनीला 4 मिलियन डॉलर्स (25.54 कोटी रुपये) एवढी कमाई क्रिकेटमधून मिळते. तर 27 मिलियन (सुमारे 172.62 कोटी ) एवढे जाहिरातीतून मिळतात. एक रंजक बाब म्हणजे या यादीत टॉपवर अमेरिकेचा बॉक्सर मेवेदर आहे. त्याची एकूण कमाई 1915 कोटी रुपये आहे. त्यात मेवेदरने 1819.86 कोटी बॉक्सिंगमधून तर केवळ 95.81 कोटी रुपये जाहिरातीतून कमावले आहेत. धोनीच्या बाबतीत स्थिती उलटी आहे. गेल्या वर्षी धोनी यादीत 22 व्या स्थानी होता, मात्र त्याची घसरण झाली आहे.

बॉक्सर अव्वल
सर्वात श्रीमंत खेळाडुंच्या यादीत अमेरिकाचा बॉक्सर फ्लॉयड मेवेदर टॉपवर आहे. त्याची एकूण कमाई सुमारे 1915 कोटी रुपये आहे. दुसऱ्या स्थानावरही बॉक्सर मॅनी पखियाऊ आहे. दोघांच्या कमाईत बरीच तफावत आहे. पखियाऊ यांची एकूण संपत्ती 1021 कोटी रुपये आहे.

अशी मोजतात संपत्ती
फोर्ब्स दरवर्षी टॉप 100 अॅथलिट्सची यादी जाहीर करते. त्यात गेल्या एका वर्षात खेळाडुंना विविध मार्गाने उत्पन्न मिळत असते. त्यात खेळातून मिळालेले मानधन, बोनस, प्राइज मनी, जाहिराती यासह इतर उत्पन्नाचा समावेश असतो. या यादीत खेळाडुंच्या 1 जून 2014 पासून 1 जून 2015 दरम्यान कमाईचा समावेश केला जातो.
टॉप 10 की लिस्टः
क्र.खेळाडूखेळएकूण कमाई (कोटींमध्ये )खेळाद्वारेजाहिरातींतून
1फ्लॉयड मेवेदरबॉक्सिंग1915.651819.8695.81
2मॅनी पखियाऊबॉक्सिंग1021.68945.5776.70
3क्रिस्टीयानो रोनाल्डोफुटबॉल508.80336.14172.58
4लियोनल मेस्सीफुटबॉल471.69331.08140.61
5रॉजर फेडररटेनिस428.2657.51370.64
6जेम्स लेब्रॉयनबास्केटबॉल414.10132.94281.24
7केविन डुरंटबास्केटबॉल345.80122.08223.70
8फिल मेकिल्सनगोल्फ324.6917.90306.79
9टायगर वुड्सगोल्फ323.413.83319.59
10कोबे ब्रायंटबास्केटबॉल316.45150.21166.20