रांची- भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंह धोनी फुटबॉल खेळातही माहिर आहे. धोनीने बुधवारी एक फ्रेंडली फुटबॉल मॅच खेळले. या मॅचमध्ये धोनी सिल्ली स्पोर्टस् संघाकडून खेळले. मॅचमध्ये धोनीने गोल लावून संघाला विजय देखिल मिळवून दिला. तर दुसरा गोल झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री आणि धोनीचे निकटचे मित्र सुदेश महतो यांनी केला. या सामन्यात धोनीच्या टीमने 2-1 असा विजय मिळवला.
हा सामना सिल्ली स्पोर्टस् आणि कांके इलेव्हनमध्ये खेळला गेला. 90 मिनट चालणा-या या सामण्यात धोनी चांगले झळकले. राईट आउटने खेळतांना धोनीने सामण्याच्या पाचव्याच मिनिटाला सुदेश महतो कडे एक जोरदार शॉट मारला. परंतु बॉल गेंद बारला स्पर्श करून बाहेर निघाला. सामन्याच्या 16 व्या मिनिटाला धोनीने चार-पाच खेळाडंना चकमक देऊन शानदार गोल केला. आणि टीमला 1-0 अशी बडत मिळवून दिली.
अब्दुल कलाम यांना दिली श्रधांजली
सामन्याच्या सुरूवातीला महेंद्रसिंह धोनी आणि सुदेश कुमार महतो यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करूण श्रधांजली वाहिली. यापुर्वी सिल्लीमध्ये धोनीचे जोरदार स्वागत करण्यात आले हाते.
पुढील स्लाईड क्लिककरूण पाहा सामन्यातील धोनीचे फोटो....