आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mumbai City FC's Subhash Singh Says, Indian Super League Is Better Than I League

इंडियन सुपर लीग:: व्हॅलेसियाचा डबल धमाका; चेन्नईयन एफसी विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सहा मिनिटांच्या अंतरात स्टार फॉरवर्ड मेंदोजा व्हॅलेसियाने गोलचा डबल धमाका उडवून चेन्नईयन एफसीला एकतर्फी विजय मिळवून दिला. या गोलच्या बळावर चेन्नईयन टीमने शुक्रवारी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत यजमान मुंबई सिटीचा पराभव केला. चेन्नईच्या टीमने रंगतदार सामन्यात २-० अशा फरकाने विजयाची नोंद केली. यासह चेन्नई टीमचा लीगमधील हा दुसरा विजय ठरला.

तसेच या विजयाच्या बळावर चेन्नईयन संघाने सहा गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले. दुसरीकडे मुंबई सिटीला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या टीमला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सामन्यात ६० व्या मिनिटाला चमत्कार
ही रंगतदार लढत ५९ व्या मिनिटापर्यंत शून्य गोलने बरोबरीत होती. त्यानंतर व्हॅलेसियाने सामन्यात चमत्कारिक खेळी केली. त्याने ६० आणि ६६ व्या मिनिटाला गोल करून चेन्नईयन टीमला शानदार विजय मिळवून दिला.

कोलकातासमोर आज पुणे
पुणे- इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या अॅथलेटिको डी कोलकाता टीमला शनिवारी यजमान एफसी पुणे सिटीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. गत सामन्यातील पराभवातून सावरत पुणे सिटी संघ घरच्या मैदानावर विजयासाठी उत्सुक आहे. त्यासाठी यजमान टीमचे अव्वल खेळाडू उत्सुक आहेत. गत सामन्यात दिल्ली डायनामोजने यजमान पुणे टीमचा २-१ ने पराभव केला होता.
बातम्या आणखी आहेत...