आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्ती लीगला सुरुवात, मुंबई गरुडची विजयी झेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय कुस्तीच्या इतिहासात प्रथमच अायाेजित करण्यात अालेल्या प्राे कुस्ती लीगला गुरुवारी माेठ्या दिमाखदार साेहळ्यात सुरुवात झाली. खाशाबा जाधव स्टेडियमवर रंगारंग कार्यकमात या लीगचे जल्लाेषात उद््घाटन झाले. या उद््घाटन साेहळ्याला सिनेअभिनेता धर्मेंद्र, बाॅबी देअाेल, भारतीय कसाेटी टीमचा कर्णधार विराट काेहली, माजी क्रिकेटपटू नवज्याेत सिद्धूसह इतर मान्यवरांनी माेठ्या संख्येत उपस्थिती लावली.

विद्युत राेषणाईने नयनरम्य रंगलेल्या या साेहळ्याला चिअर गर्ल्सने चांगलीच रंगत अाणली. या साेहळ्याला लीगमध्ये सहभागी झालेल्या सहा फ्रँचायझींच्या संघांचे खास पद्धतीने स्वागत करण्यात अाले. या साेहळ्यात अाॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमार, याेगेश्वर दत्त, अाॅलिम्पियन गीता फाेगट, नरसिंग यादव, राहुल अावारेसारख्या अव्वल मल्लांनी सर्वांचे लक्ष वेधले. स्पर्धेत मुंबई गरुड अाणि पंजाब राॅयल्स यांच्यात सामना रंगला. या वेळी माेठ्या संख्येत कुस्तीचे चाहते उपस्थित हाेतेे.

मुंबईची विजयी सलामी
लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई गरुड टीमने शानदार विजयी सलामी दिली. या टीमने सलामीला पंजाब राॅयल्सचा पराभव केला. मुंबई संघाने ५-२ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. साक्षी मलिकच्या शानदार विजयाच्या बळावर मुंबईला सामना जिंकता अाला. मात्र, मुंबईचा स्टार युवा खेळाडू राहुल अावारेला सलामीला पराभवाला सामाेरे जावे लागले.
प्रियंका फाेगट पराभूत : पंजाबच्या प्रियंका फाेगटला पराभवाचा सामना करावा लागला. महिलांच्या ५३ किलाे वजन गटात मुंबईच्या अाेदुनायाे अादेकाेराेयेने शानदार विजय मिळवला. तिने प्रियंकावर १०-२ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. दाेन्ही खेळाडूंनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर गीता फाेगटचा पराभव झाला.

विराट काेहली अाखाड्यात
प्रो कुस्ती लीगमधील ‘जे एस डब्ल्यू’ ग्रुपच्या मालकीच्या बंगळुरू योद्धाजचे सहमालकत्व क्रिकेटपटू विराट कोहलीने स्वीकारले आहे. आजपासून दिल्लीच्या खाशाबा जाधव स्टेडियमवर प्रो कुस्ती लीगला सुरुवात झाली. विराट कोहलीच्या बंगळुरू योद्धाजचा कप्तान ऑलिम्पियन नरसिंग यादव अाहे. त्याच्यासह संदीप तोमर, बजरंग, ऑलिनिक, जॉर्जियाचा डॅव्हिट हे खेळाडू संघात आहेत.
साक्षी मलिकने गीताला हरवले
महिलांच्या ५८ किलाे वजन गटात मुंबईची युवा मल्ल साक्षी मलिकने सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने अापल्या पहिल्या सामन्यात पंजाब राॅयल्सची अायकाॅन खेळाडू गीता फाेगटचा पराभव केला. ही रंगतदार लढत ८-८ ने बराेबरीत राहिली हाेती. मात्र, त्यानंतर शेवटच्या मिनिटांत गुणांची नाेंद करून साक्षीने सामना जिंकला. यासह गीता फाेगटला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंजाबला सामना गमवावा लागला.
पंजाबच्या ब्लादिमीरकडून मुंबईचा राहुल अावारे चीत
जाॅर्जियाच्या ब्लादिमीरने पंजाबचे प्रतिनिधित्व करताना लीगमधील सलामीचा सामना जिंकला. त्याने सलामीला मंुबई गरुड संघाचा युवा खेळाडू राहुल अावारेला चीत केले. त्याने ६-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. या विजयाच्या बळावर पंजाबने मुंबईविरुद्ध अाघाडी घेतली होती.
धर्मेंद, बाॅबी देअाेलची खास उपस्थिती
सिनेअभिनेता धर्मेंद्र अाणि बाॅबी देअाेल यांच्या खास उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. या लीगच्या उद््घाटन साेहळ्यादरम्यान या दाेघांची उपस्थिती हाेती. त्यांनी मुंबई गरुड अाणि पंजाब रॉयल्स यांच्यात झालेल्या सलामी सामन्यातील कुस्तीचा अानंद लुटला.