आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Reached In Final Of PBL After Lost Of Saina Nehwal

पीबीएल : सायनाच्या पराभवाने वाॅरियर्स गारद; मुंबई अंतिम फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - जगातील माजी नंबर वन सायना नेहवालच्या पराभवानंतर अवध वाॅरियर्स टीम प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गारद झाली. दुसरीकडे शानदार विजयासह अक्षय कुमारच्या मुंबई राॅकेट्सने पहिल्या सत्रातील या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. फाॅर्मात असलेल्या मुंबई संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात शुक्रवारी वाॅरियर्सवर ३-० अशा फरकाने विजयाची नाेंद केली.

दुखापतीने त्रस्त असलेल्या सायना नेहवालने उपांत्य लढतीतील ट्रम्प सामन्यात नशीब अाजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला सपशेल अपयशाला सामाेरे जावे लागले. तिच्या अपयशाने वाॅरियर्स टीमही पराभूत झाली. चीनच्या हान लीने महिला एकेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मंुबईला विजय मिळवून दिला. तिने सायनावर अवघ्या ४१ मिनिटांत मात केली. हानने १५-८, १३-१५, १५-७ अशा फरकाने विजय मिळवला. या पराभवाने वाॅरियर्सचे एका गुणांचे नुकसान झाले. त्यामुळे या टीमला पराभवाच्या नामुष्कीला सामाेरे जावे लागले.

रविवारी फायनल
पहिल्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या किताबासाठी रविवारी फायनल रंगणार अाहे. या वेळी जेतेपदासाठी मुंबई राॅकेट्स अाणि दिल्ली एेसर्स यांच्यात अंतिम सामना हाेईल. दिल्लीने गुरुवारी उपांत्य लढतीत चेन्नईवर मात करून फायनल गाठली.