आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू मुंबाची गाडी सुसाट, मुंबाने बंगळुरू बुल्सला ३६-२९ गुणांनी केले पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्णधारअनुप कुमारच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर यू मंुबाने आपली विजयी घौडदौड कायम राखली. मुंबाने यजमान बंगळुरू बुल्सवर ३६-२९ गुणांनी पराभूत केले. या विजयासह मुंबाने ५० गुणांसह पहिले स्थान कायम ठेवले.
यू मुंबाने आज बचावामध्ये तब्बल १९ गुण मिळवत नवा विक्रम नोंदवला. सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर यांनी प्रत्येकी पकडी करत बंगळुरू बुल्सच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. त्यांना जिवा कुमार आणि विशाल माने यांनी चांगला सपोर्ट केला. बंगळुरू बुल्सचा कॅप्टन मनजित चिल्लरला जवळपास २० मिनिटे मैदानाबाहेर बसवून ठेवण्यात अनुप कुमार यशस्वी झाला आणि तिथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली. यू मुंबाने मध्यंतराला १८-१३ अशी आघाडी घेताना बंगळुरू बुल्सवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. मुंबाने बंगळुरूला लढतीत एकदाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही.