आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीबीएल : हैदराबाद हंटर्सविरुद्ध मुंबई राॅकेट्सचा ४-१ ने विजय, पी. कश्यपचा पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - ब्रँड अॅम्बेसेडर अक्षय कुमारच्या मुंबई राॅकेट्स संघाने प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. या टीमने साेमवारी लीगमध्ये यजमान हैदराबाद हंटर्सचा पराभव केला. फाॅर्मात असलेल्या मुंबईने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला.

नवाेदित स्टार युवा खेळाडू एचएस प्रणवने अव्वल कामगिरी करताना मुंबई टीमचा विजय साकारला. त्याने भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी. कश्यपला सरळ दाेन गेममध्ये पराभूत केले. त्याने १५-११, १५-१३ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. त्यामुळे मुंबईच्या टीमला सामन्यातील अापला दबदबा कायम ठेवता अाला. कश्यपने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, प्रणवच्या सरस कामगिरीमुळे त्याला अपयशाला समाेरे जावे लागले.

गुरुसाईची सिरीलवर मात
मुंबई राॅकेट्सचा युवा खेळाडू गुरुसाईदत्तने शानदार विजय मिळवला. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत यजमान हैदराबादच्या सिरील वर्माला घरच्या मैदानावर धूळ चारली. त्याने १५-१२, १५-४ अशा फरकाने सामना जिंकला. गुरुसाईने सरस खेळी करून सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली.

ज्वाला-किडाेचा पराभव
मिश्र दुहेरीत हैदराबादची ज्वाला गुट्टा अाणि मार्किस किडाेला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या कामिल्ला अाणि ब्लादिमीरने रंगतदार सामन्यात ज्वाला-किडाेवर मात केली. त्यांनी १५-८, १५-८ ने विजयाची नाेंद केली. त्यामुळे मुंबई टीमला अापली लय कायम ठेवता अाली.