आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू मुंबाकडून पाटणा पायरेट्सचा पराभव; तिसऱ्या विजयाची नाेंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राे लीगमध‌ील अापल्या तिसऱ्या सामन्यात पाटणा टीमच्या रेडरची पकड करताना यू मुंबा संघाचे खेळाडू. - Divya Marathi
प्राे लीगमध‌ील अापल्या तिसऱ्या सामन्यात पाटणा टीमच्या रेडरची पकड करताना यू मुंबा संघाचे खेळाडू.
मुंबई- गत उपविजेत्या यू मुंबा संघाने दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये तिसऱ्या अनुपम विजयाची नाेंद केली. यजमान मुंबा टीमने घरच्या मैदानावर साेमवारी पाटणा पायरेट्सचा पराभव केला. यजमानांनी २५-२० अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. कर्णधार अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली यू मुंबाचा हा सलग तिसरा विजय ठरला. यापूर्वी मुंबाने जयपूर अाणि बंगळुरू बुल्सचा पराभव केला अाहे.

अनुप कुमार (७), शब्बीर बापू (५) अाणि रिशांक देवडिगाने (४) मुंबा टीमच्या माेलाचे याेगदान दिले. अाता मुंबईचा चाैथा सामना मंळवारी पुणेरी पलटणशी हाेणार अाहे.
पुण्याचे पानिपत : फाॅर्मात असलेल्या तेलुगू टायटन्सने साेमवारी लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. राहुलच्या नेतृत्वाखाली टायटन्सने पुणेेरी पलटणचे पानिपत केले. टायटन्सने ४५-२४ ने विजयाची नाेंद केली. यापूर्वी या टीमने दबंग दिल्लीला पराभूत करून लीगमध्ये विजयाचे खाते उघडले.

पुणेरी पलटणविरुद्ध सामन्यात कर्णधार राहुलसह (१२) संदीपने (५) सर्वाधिक गुणांची कमाई करून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. या वेळी सुकेश (२) अाणि राजगुरू (३) यांनीही समाधानकारक खेळी करून विजयात याेगदान दिले वजीरचे डावपेच अपयशी :
पुणेरी पलटणचा कर्णधार वजीरने अाखलेले सर्व डावपेच अपयशी ठरले. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने ७ गुणांची कमाई करून विजयासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याला संघाचा पराभव टाळता अाला नाही.

हॅट‌्ट्रिकची नाेंद
अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली यू मुंबा संघाने सलग तिसऱ्या विजयासह हॅट‌्ट्रिक साजरी केली. या संघाने साेमवारी घरच्या मैदानावर पाटणाचा पराभव केला. मुंबाचा हा लीगमधील व घरच्या मैदानावरचा सलग ितसरा विजय ठरला. अाता याच मैदानावर मुंबा अाज चाैथा सामना खेळणार अाहे.

२५-२०
ने विजय
०७
गुणांचे अनुपचे याेगदान
०३
विजय मुंबाने मिळवले
१५
गुणांसह अव्वलस्थानी
बातम्या आणखी आहेत...