मुंबई - देशातील अन्य क्रिकेट संघटनांप्रमाणे, मुंबई क्रिकेट असोसिएशननेही लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या शिफारशी स्वीकारण्यासंदर्भातील पत्रामध्ये आमची समिती १७ जणांची असावी, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे कळते. लोढा समितीने सुचवल्याप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोशाध्यक्ष, सचिव व संयुक्त सचिव, याव्यतिरिक्त असोसिएशनचा कारभार पाहण्यासाठी आठ समिती सदस्य नियुक्त करण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेचा व्याप मोठा आहे. देशातील कोणत्याही असोसिएशनपेक्षा जास्त म्हणजे २७० ते २९० स्पर्धांचे वर्षभर आयोजन करण्यात येते. आपल्या अडचणी एमसीए लोढा समितीकडे सांगणार आहे.