आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरे विम्बल्डन चॅम्पियन, फायनलमध्ये राअाेनिकवर 6-4, 7-6, 7-6 ने मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला अँडी मरे सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने रविवारी पुरुष एकेरीचा किताब जिंकला. इंग्लंडच्या मरेने फायनलमध्ये कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकचा पराभव केला.त्याने ६-४, ७-६, ७-६ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद अापल्या नावे केले. यापूर्वी त्याने २०१३ मध्ये या स्पर्धेचा किताब जिंकला हाेता. अाता त्याने २ तास ४८ मिनिटांमध्ये विजयश्री खेचून अाणली.

स्विस किंग राॅजर फेडररला पराभूत करून फायनल गाठणाऱ्या सहाव्या मानांकित राअाेनिकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला फार काळ मरेच्या अाव्हानासमाेर अापला टिकाव कायम ठेवता अाला नाही. त्याने दुसऱ्या अाणि तिसऱ्या सेटवर शर्थीची झुंज दिली. मात्र, दुसऱ्या मानांकित मरेने सरस खेळीच्या बळावर दाेन्ही सेट जिंकले. यासाठी त्याने सामन्यात ७ एेस अाणि ३९ विनर्स मारले.
चेक गणराज्यच्या टाॅमस बर्डिचचे अाव्हान संपुष्टात अाणून इंग्लंडच्या मरेने अंतिम फेरी गाठली हाेती. नाेवाक याेकाेविक अाणि फेडररचा पराभव ‌झाल्याने मरेला किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात हाेते. मात्र, त्याचबराेबर फेडररला धूळ चारणारा मिलाेस राअाेनिकही हा बराेबरीचा अव्वल खेळाडू ठरला हाेता. फेडररवरच्या विजयाने त्याचेही फायनलमधील विजयाचे पारडे अधिक जड मानले जात हाेते. मात्र, त्याला अापली अाक्रमक खेळीची लय कायम ठेवता अाली नाही. परिणामी ताे उपविजेता ठरला.

सेरेना-व्हीनसचा किताबी षटकार : सेरेनाने माेेठी बहीण व्हीनससाेबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या किताबाचा षटकार मारला. अमेरिकेच्या या विल्यम्स भगिनींनी १ तास २७ मिनिटांत विजेतेपद पटकावले. त्यांचा या स्पर्धेतील हा सहावा किताब ठरला. तसेच एकूण टेनिस करिअरमधील १४ वा ग्रँडस्लॅम किताब त्यांनी अापल्या नावे केला. या जाेडीने तिमिया बाबाेस व श्वेदाेवाला सरळ दाेन सेटमध्ये ६-३, ६-४ ने धूळ चारली.
पुढे वाचा, मरेच्या नावे तिसरे ग्रँडस्लॅम..
बातम्या आणखी आहेत...