आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरेची चाैथ्या फेरीत धडक; कार्लाेविचची त्साेंगावर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर जल्लाेष करताना इंग्लंडचा मरे. - Divya Marathi
विजयानंतर जल्लाेष करताना इंग्लंडचा मरे.
लंडन - माजी चॅम्पियन अँडी मरेने अापली विजयी माेहीम अबाधित ठेवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या चाैथ्या फेरीत धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. इंग्लंडच्या मरेने सामन्यात इटलीच्या अांद्रे सेप्पीचा ६-२, ६-२,१-६, ६-१ अशा फरकाने पराभव केला. यासह त्याने पुढच्या फेरीत प्रवेश केला. यासाठी तिस-या मानांकित मरेला दाेन तास सात मिनिटे झुंज द्यावी लागली. अापल्या खांद्याच्या गंभीर दुखापतीवर मात करून त्याने सामना अापल्या नावे केला.

इटलीच्या सेप्पीने दमदार सुरुवात करून पहिल्याच सेटवर बाजी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने तब्बल ४० मिनिटे अापले वर्चस्व कायम ठेवताना मरेला एकही गुण मिळू दिला नाही. मात्र, त्यानंतर तिस-या मानांकित मरेने दमदार पुनरागमन करून पहिला सेट अापल्या नावे केला. याशिवाय त्याने लढतीत अाघाडी मिळवली. इंग्लंडच्या २८ वर्षीय मरेने दाेन सेट जिंकून मजबूत अाघाडी घेतली हाेती. सेप्पीने पुन्हा कमबॅकचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्याने तिसरा सेट जिंकला. मात्र, त्याला चाैथ्या सेटमध्ये अपयशाला सामाेरे जावे लागले. मरेने सामना जिंकला. अाता त्याचा चाैथ्या फेरीतील सामना क्राेएशियाच्या इवा कार्लाेविचशी हाेईल.

त्साेंगाचे अाव्हान संपुष्टात
फ्रान्सच्या ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाचे अाव्हान संपुष्टात अाले. त्याला पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. क्राेएशियाच्या इवा कार्लाेविचने रंगतदार सामन्यात फ्रान्सच्या पराभूत केले. त्याने ७-६, ४-६, ७-६, ७-६ ने धूळ चारली. या पराभवासह १३ व्या मानांकित त्साेंगाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.