आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम फायटरने लाँच केला 'स्पोर्टी हिजाब'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अमेरिकेचा माजी बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डनचा स्वत:चा बुटाचा ब्रँड आहे. दुसरीकडे स्टार गोल्फर टायगर वुड्स चा स्वत:चा गोल्फ कपड्याचा ब्रँड आहे. या यादीत आता मुस्लिम मुआई थाई चॅम्पियनने हिजाबचे कलेक्शन लाँच केले आहे.
लंडनमध्ये राहणारी मूळची बांगलादेशी मार्शल आर्ट्स फायटर रुखसाना बेगमने विशेष प्रकारचा "स्पोर्टी हिजाब' डिझाइन केला आहे. खेळत असताना मुस्लिम महिला खेळाडूंना परिधान करण्यासाठी हा उपयुक्त आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे खेळताना हा हिजाब डोक्यावरून घसरून पडत नाही. ताे स्ट्रेचेबल लायक्रा कपड्याने बनलेेला आहे. फायटिंग करताना हा हिजाब सरकत नाही.

अॅटमवेट मुआई थाई बॉक्सिंगची ब्रिटिश चॅम्पियन रुखसाना वर्ल्ड टायटलसाठी खेळेल. या वेळी तिने आपण डिझाइन केलेला हिजाब लाँच केला. तिच्यासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला. रुखसाना म्हणाली, "मुस्लिम असल्यामुळे हिजाबचे महत्त्व मला माहिती आहे. यामुळे मी मुस्लिम खेळाडूंच्या सोयीसाठी अशा प्रकारचा विशेष हिजाब बनवला आहे. खेळात सर्वांसाठी सारखेच अाहे. फक्त हिजाबमुळे मुस्लिम महिला खेळापासून वंचित होऊ नये, असे मला वाटते.' रुकसाना १८ वर्षांची होती, तेव्हा तिने मुआई थाईचे ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली. तिचे कुटुंंब पारंपरिक होते. यामुळे कुटुंबापासून लपून सराव करीत असे. मात्र, काही दिवसांनी तिच्या वडिलांना हे कळले. रुखसाना म्हणते, "माझ्या वडिलांनी सामाजिक बदलांना स्वीकारले. संस्कृती व परंपरा सोडू नको, असे त्यांनी मला सांगितले. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता, यामुळे त्यांनी मला खेळण्याची परवानगी दिली. मी हिजाब घालत नाही, मात्र रोजा निश्चितपणे ठेवते,' असे ते म्हणाली.

बँकॉकमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये रुखसानाने कांस्यपदक जिंकले आहे. ती आपल्या गटात ब्रिटिश चॅम्पियन बनली. तिला ब्रिटिश टीमचा कर्णधारही बनवण्यात आले. यानंतर रुखसानाने लात्विया येथे आयोजित युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले. ती लंडन ऑलिम्पिकमध्ये (२०१२) क्रीडाज्योत घेऊन धावली होती. रुखसानाला इंग्लंडच्या एकाही कंपनीची साथ मिळाली नाही.