आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धा : नदाल, फेरर विजयी; मरेचा राेमहर्षक विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील माजी नंबर वन राफेल नदाल, नाेवाक याेकाेविक, अँडी मरे व डेव्हिड फेरर यांनी मंगळवारी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. दुसरीकडे महिला गटात विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्विताेवासह पाचव्या मानांकित कॅराेलिना वाेज्नियाकीने दुसऱ्या फेरीत धडक मारली. तसेच २००९ची चॅम्पियन स्वेतलाना कुज्नेत्साेवाने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. तिने किकी बेर्टेन्सवर ६-१, ४-६, ६-२ ने मात केली.

जगातील नंबर वन याेकाेविकने सलामी सामन्यात जार्काे निमिननेचा पराभव केला. त्याने ६-२, ७-५, ६-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला. याशिवाय त्याने दुसऱ्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. तसेच नऊ वेळच्या फ्रेंच अाेपन चॅम्पियन राफेल नदालने पुुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बाजी मारून अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. त्याने फ्रान्सच्या क्विंटन हेल्सचा पराभव केला. नदालने रंगतदार सामन्यामध्ये ६-३, ६-३, ६-४ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. हा सामना जिंकून स्पेनच्या नदालने दुसऱ्या फेरीत धडक मारली. यासाठी त्याला फ्रान्सच्या युवा खेळाडूने झुंजवले. मात्र, दुखापत अाणि सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून सातव्या मानांकित नदालने सामना अापल्या नावे केला. तसेच इंग्लंडच्या मरेने अर्जेटिनाच्या फाकुंडाे अारगुएलाेवर ६-३, ६-१, ६-१ ने मात केली.

वाेज्नियाकी दुसऱ्या फेरीत
महिला एकेेरीच्या सलामी सामन्यात पाचव्या मानांकित कॅराेलिना वाेज्नियाकीने एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने पहिल्या फेरीत इटलीच्या करिना कान्पवर मात केली. डेन्मार्कच्या वाेज्नियाकीने ६-३, ६-० ने सामना जिंकला. या विजयासह तिला दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित करता अाला. अाता माजी नंबर वन वाेज्नियाकीला जर्मनीच्या ज्युलिया जाॅर्जेसविरुद्ध खेळावे लागणार अाहे.

डेव्हिड फेररचा ३०० वा विजय
स्पेनच्या डेव्हिड फेररसाठी फ्रेंच अाेपनच्या पहिल्या फेरीतील विजय हा अविस्मरणीय ठरला. त्याने सलामीच्या लढतीत स्लाेव्हाकियाच्या लुकास लास्काेचा पराभव केला. स्पेनच्या ३३ वर्षीय फेररने ६-१, ६-३, ६-१ अशा फरकाने विजय मिळवला. यासह त्याने टेनिस करिअरमध्ये क्ले काेर्टवरील ३०० व्या विजयाची नाेंद अापल्या नावे केली. त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली.

पेत्राची अडीच तास झुंज
महिला एकेरीच्या सलामी सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्विताेवाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने अडीच तास शर्थीची झुंज देऊन विजयश्री खेचून अाणली. चौथ्या मानांकित पेत्राने पहिल्या फेरीत न्यूझीलंडच्या मारिना एराकाेविकचा पराभव केला. तिने ६-४, ३-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला अाणि दुसरी फेरी गाठली.
बातम्या आणखी आहेत...