आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेनिसने नदालची नंबर वनची संधी हिरावली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माँट्रियल- १५ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदाल पुन्हा एकदा जगातील नंबर वन टेनिसस्टार म्हणून सिंहासनावर विराजमान हाेणार हाेता. त्यापासून ताे एकाच पावलावर हाेता. ही सुवर्ण संधी एक बिगरमानांकित खेळाडू सहजरीत्या हिरावून घेऊ शकेल याची कल्पनाही त्याने केली नसेल.  कॅनडाच्या १८ वर्षीय डेनिस शापाेवालाेवने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत माजी नंबर वन राफेल नदालविरुद्ध सामन्यात सनसनाटी विजयाची नांेंद केली. त्याने ३-६, ६-४, ७-६ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. या विजयाच्या बळावर कॅनडाच्या युवा खेळाडूने स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये धडक मारली. याशिवाय त्याने  स्पेनच्या नदालला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.   

एकाच पावलावर हाेती संधी 
जखमी मरे, नाेवाक याेकाेविक अाणि वावरिंकाच्या अनुपस्थितीमुळे नदालला या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात हाेते. मात्र, यासाठी त्याला केवळ उपांत्य फेरी गाठायची हाेती. यासह ताे नंबर वनचा मुकुट सहज काबीज करू शकला असता. मात्र, कॅनडाच्या खेळाडूने त्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले.   

डेव्हिड फेररचा पराभव 
नदालपाठाेपाठ स्पेनच्या डेव्हिड फेररलाही तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्विस किंग राॅजर फेडररने लढतीत डेव्हिड फेररवर मात केली. त्याने ४-६, ६-४,६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम चारमध्ये धडक मारली.
बातम्या आणखी आहेत...