आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धा: नदाल, राॅजर फेडररचा विजय; सानिया मिर्झाची दुहेरीत अागेकूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क - नंबर वन राफेल नदाल, १९ वेळचा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन राॅजर फेडररने अापली विजयी माेहीम कायम ठेवताना रविवारी अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेच्या चाैथ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे इटलीच्या फेबियाे फाेगनिनीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. सानिया मिर्झाने महिला दुहेरीत अागेकूच केली.  

स्पेनच्या राफेल नदालने पुुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने लढतीमध्ये लेनादाे मेयरचा पराभव केला. त्याने ६-७, ६-३, ६-१, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याने ३ तास १६ मिनिटांपर्यंत झंुज दिली. यासह त्याने पुढची फेरी गाठली.    
फेडररची लाेपेझवर मात : सहाव्या किताबाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या राॅजर फेडररने अापली विजयी लय कायम ठेवली. त्याने लढतीमध्ये ३१ व्या मानांकित फेलिसिनाे लाेपेझला धूळ चारली. त्याने ६-३, ६-३, ७-५ अशा फरकाने सामना जिंकला. 

कॅराेलिना प्लिस्काेवा विजयी : नंबर वन कॅराेलिना प्लिस्काेवाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये शानदार विजय संपादन केला. तिने चीनच्या झांग शुईवर मात केली. तिने ३-६, ७-५, ६-४ ने विजय मिळवला. यासाठी तिला माेठी झुंज द्यावी लागली. 
 
सानिया-पेंग शुअाईची १३३ मिनिटे झुंज 
भारताच्या सानिया मिर्झाने अापली सहकारी पेंग शुअाईसाेबत महिला दुहेरीची तिसरी फेरी गाठली. यासाठी तिला तब्बल १३३ मिनिटे झंुज द्यावी लागली. या चाैथ्या मानांकित जाेडीने दुसऱ्या फेरीमध्ये स्लाेव्हाकियाच्या जाना केपेलाेवा अाणि रिबारिकाेवावर मात केली. त्यांनी ६-७, ६-३, ६-३ ने सामना जिंकला.
बातम्या आणखी आहेत...