आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच अाेपन : सेरेना, राफेल नदालची अागेकूच, अझारेंका तिसऱ्या फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स अाणि नऊ वेळच्या चॅम्पियन राफेल नदालने गुरुवारी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेत अागेकूच केली. दुसरीकडे पुरुष एकेरीत मरिन सिलीचनेही स्पर्धेत शानदार विजयासह पुढच्या फेरीत धडक मारली.

तसेच महिला गटात चेक गणराज्यच्या पेत्रा क्विताेवाने एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या सिल्हिया साेलेरचा पराभव केला. चाैथ्या मानांकित पेत्राने ६-७, ६-४, ६-२ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. यासह तिने पुढच्या फेरीतील अापले अाव्हान कायम ठेवले.

नदालची अल्मार्गाेवर मात
दहाव्या किताबासाठी उत्सुक असलेल्या माजी नंबर वन राफेल नदालने अापली विजयी माेहीम अबाधित ठेवताना पुढची फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ६-४, ६-३, ६-१ अशा फरकाने विजय संपादन केला. या वेळी जागतिक क्रमवारीत १५४ व्या स्थानावर असलेल्या निकाेलस अल्मार्गाेला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. मात्र, बलाढ्य नदालसामेर त्याला यशाची किनार गाठता अाली नाही. दुसरीकडे नदालने दुखापतीला दूर सारून पुढची फेरी गाठली अाहे.

बर्नाड टाॅमिकचा पराभव
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत २७ व्या मानाकंत बर्नाड टाॅमिकला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अाॅस्ट्रेलियन सहकारी थानासी काेक्कीननास्कीने रंगतदार सामन्यात धुळ चारली. अाॅस्ट्रेलियाच्या बिगरमाानंकित खेळाडूने ३-६, ३-६, ६-३, ६-४, ८-६ अशा फरकाने सनसनाटी विजय संपादन केला. यासह त्याने तिसऱ्या फेरीत धडक मारली. या अनपेक्षित पराभवासह अाॅस्ट्रेलियाच्या बर्नाडला स्पर्धेतील अापला गाशा दुसऱ्याच फेरीत गुंडाळावा लागला अाहे.

अझारेंकासमाेर अाता सेरेनाचे अाव्हान
महिला गटात व्हिक्टाेरिया अझारेंकाने तिसऱ्या फेरीत धडक मारली. तिने लुसियावर एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने ६-२, ६-३ ने मात केली. यासह तिने विजयी मोहीम कायम ठेवली. अाता तिला सेरेनाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.

सेरेनाची लेनावर मात
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत १९ वेळच्या ग्रँडस्लॅम सेरेनाने शानदार विजय संपादन केला. तिने सामन्यात अॅना-लेना फ्रिड्समचा पराभव केला. अव्वल मानांकित सेरेनाने ५-७, ६-३, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी तिला तीन सेटपर्यंत झंुज द्यावी लागली. जागतिक क्रमवारीत १०५ व्या स्थानावर असलेल्या अॅनाने रंगतदार सामन्यात सेरेनाला चांगलेच झंुजवले. तिने पहिला सेट जिंकून धक्कादायक विजयाकडे अागेकूच केली हाेती. सरस अाणि अाक्रमक खेळी करताना सेरेनाने दुसरा अाणि तिसरा निर्णयाक सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.
Debate Placeholder
बातम्या आणखी आहेत...