आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाल ठरेल एक ग्रँडस्लॅम दहा वेळा जिंकणारा पहिला खेळाडू!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील माजी नंबर वन राफेल नदाल यंंदा फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात अाहे. सध्या स्विसकिंग राॅजर फेडररची अनुपस्थिती, नाेवाक याेकाेविकने गमावलेली लय अाणि अॅडी मरेची स्पर्धेपूर्वीची दुखापतीसारख्या बाबींमुळे नदालचा चॅम्पियन हाेण्याचा दावा अधिक मजबूत अाहे.  वर्षांतील दुसरी ग्रँडस्लॅम  फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेला रविवारपासून सुरुवात हाेणार अाहे. यंदा राॅजर फेडरर व अमेरिकन टेनिस स्टार सेरेना खेळणार नाही. 
 
१४० वर्षांच्या टेनिस इतिहासामध्ये काेणत्याही एका ग्रँडस्लॅममध्ये १० एकेरीचे किताब जिंकणारा पहिला खेळाडू हाेण्याच्या इराद्याने नदाल मैदानावर उतरणार अाहे.

सलग तीन क्ले काेर्ट किताब : स्पेनचा राफेल नदाल यंदाच्या सत्रामध्ये जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्याने अाॅस्ट्रेलियन अाेपनच्या फायनलमध्ये फेडररकडून मिळालेल्या पराभवानंतर मियामी अाेपनची अंतिम फेरी गाठली हाेती. त्यानंतर त्याने माेंटे कार्लाे, बार्सिलाेना अाेपन व माद्रिद मास्टर्ससारख्या स्पर्धेच्या माध्यमातून सलग तीन ग्रँडस्लॅम किताब  अापल्या नावे केले अाहेत.

उपांत्य फेरीत झुंजणार नदाल-याेकाे
- गत चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या याेकाेविकची उपांत्य लढत नदालशी हाेऊ शकताे.
- नदालचा सलामी सामना बेनाेएट पियरेशी  हाेईल. याेकाेविकचा सलामी सामना मार्सेेल ग्रैनाेलर्सशी.
- अव्वल मानांकित मरे हा पहिल्या फेरीत रशियाच्या अांद्रे कुज्नेत्साेवाविरुद्ध खेळणार. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना निकाेलस वा डेल पेत्राेशी.  
- वावरिंका हा २०१५ मध्ये  चॅम्पियन. त्याचा सलामी सामना क्वालिफायरशी. त्याचा उपांत्य सामना मरेशी हाेईल.
- महिला गटामध्ये चेक गणराज्यची पेत्राने दुखापतीनंतरही पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली  अाहे. तिला १५ वे मानांकन मिळाले.

सर्वात कठिण ग्रँडस्लॅम :  
फ्रेंच अाेपनला सर्वात कठीण ग्रँडस्लॅम स्पर्धा मानली जाते. पीट सॅम्प्रास, अाॅर्थर एेश,बेकरसारख्यांना करिअरमध्ये याचा किताब जिंकता अाला नाही.  
 
बातम्या आणखी आहेत...