आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तर मला फासावर लटकवा : नरसिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - अाॅलिम्पिक नगरीतून माघारी जाण्यास सांगण्यात अाल्याच्या क्लेशकारक निर्णयानंतर भारतीय कुस्तीपटू नरसिंग यादव याला अस्वस्थ वाटू लागले अाहे. निर्णय एेकताक्षणी ताे बेशुद्ध पडला हाेता, मात्र शनिवारी सकाळी थाेडासा सावरल्याचे कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांनी सांगितले. नरसिंगच्या प्रकरणात अाम्ही कुणावरही अाराेप करू इच्छित नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची सीबीअाय चाैकशी व्हावी ,अशी अामची मागणी असल्याचेही या वेळी त्यांनी नमूद केले.

देशाच्या प्रतिमेवर डाग
या प्रकरणात माझ्यासह देशाच्या प्रतिमेला तडा गेला. त्यामुळे दाेषी असेन तर मला फासावर लटकवा, मात्र याचा तपास लावावा, असे नरसिंगने सांगितले. माझी व कटातील सहभागींचा नार्काे टेस्ट करा मागणीदेखील त्याने केली.

२००४ मध्येही नामुष्की
२००४ अथेन्स अाॅलिम्पिकमध्ये डाेपिंग चाचणी पाॅझिटिव्ह अाल्याने प्रतिमा कुमारी व सानामाला बाहेर काढण्यात अाले हाेते. तीच नामुश्की अाता नरसिंगवर अाली. त्याला तिथून अाता मायदेशी परतावे लागणार अाहे.

कटामागे माेठी लाॅबी
या कटामागे खूप माेठी लाॅबी असून त्यांची नावे उघड हाेण्याची गरज असल्याचेही नरसिंगने म्हटले अाहे. अशा प्रकारच्या गलिच्छ राजकारणामुळेच भारताच्या पदकसंख्येत फारशी वाढ हाेत नसल्याचेही नरसिंगने नमूद केले. मला जर न्याय मिळाला नाही, तर खेळाचे भवितव्य अंधकारमय हाेईल. तसे झाल्यास कुणीही खेळाडू देशासाठी पदकाचा ध्यास घेणार नसल्याचेही नरसिंगने म्हटले अाहे. सगळा घटनाक्रम बघितला तर यामागे काेण अाहे, त्याचा उलगडा हाेताे, असे म्हणतानाच नरसिंगने कुणाचेही नाव घेण्याचे मात्र टाळले.
बातम्या आणखी आहेत...