आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्ती लीग : ५-२ ने विजय; योगेश्वरने जिंकली लढत, योगेश्वरने जिंकली लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑलिम्पिक पदक विजेत्या योगेश्वर दत्तच्या नेतृत्वाखाली शनिवारी हरियाणा हॅमर्स संघाने प्रो-कुस्ती लीगमधील आपला दबदबा कायम ठेवला. या टीमने लीगमध्ये दिल्लीच्या वीरांना धूळ चारली. हरियाणा संघाने रंगतदार सामन्यात ५-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली.

खाशाबा जाधव स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्याच्या १२५ किलो सुपर हेवीवेट गटात हितेंद्रने बाजी मारून हरियाणाला विजय मिळवून दिला. त्याने सामन्यात दिल्लीच्या कृष्णकुमारला चीतपट केले. त्याने ७-४ ने सामना जिकंला. त्यापाठोपाठ लिवान लोपेजने दिल्लीच्या दिनेशकुमारचा ७-० अशा फरकाने पराभव करून दबदबा निर्माण केला. दीपिका विजयी; निर्मला पराभूत : महिलांच्या गटात हरियाणाच्या दीपिकाने सामना जिकंला. मात्र, निर्मलाला पराभवाचा सामना करावा लागला. तिला दिल्लीच्या विनेश फोगटने १०-० ने हरवले. दीपिकाने निक्कीवर २-१ अशा फरकाने विजय संपादन केला.
योगेश्वरचा विजय
हरियाणाचे नेतृत्व करत असलेल्या योगेश्वर दत्तने पुरुषांच्या ६५ किलाे वजन गटात बाजी मारून चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. त्याने सामन्यात शनिवारी नवरूजाेव इख्तियाेरला चीतपट केले. त्याने या रंगतदार लढतीमध्ये ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. त्याने शेवटच्या दहा सेकंदात ही लढत जिंकली.
बातम्या आणखी आहेत...