आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Girl Raut Is The Lone Athlete To Have Qualified For The Olympics From The 12th SAG.

दक्षिण अाशियाई स्पर्धा: ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ रिअाेत धावणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - सुपरफास्ट ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत अाता ब्राझीलमधील रिओच्या ट्रॅकवर धावणार अाहे. नाशिकच्या या स्टार धावपटूने शुक्रवारी अागामी रिओ अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला. भारताच्या या धावपटूने १२ व्या दक्षिण अाशियाई स्पर्धेत साेनेरी यशासह अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवण्याचा दुहेरी याेग जुळवून अाणला. तिने महिलांच्या ४२ किलाेमीटरच्या पूर्ण मॅरेथाॅनमध्ये सुवर्णपदक पटकावले. अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कविता ही महाराष्ट्राची दुसरी अाणि भारताची चाैथी महिला धावपटू ठरली. यापूर्वी ललिता बाबर, अाे. पी. जैसा अाणि सुधा सिंगने ही पात्रता पूर्ण केली अाहे.

यासह यजमान भारतीय संघाने स्पर्धेच्या सातव्या दिवशीही सुवर्णपदकांची लूट कायम ठेवली. नेमबाजीसह अॅथलेटिक्समध्ये अापला दबदबा कायम ठेवताना पदकांची कमाई केेली. अाता भारताची एकूण २४९ पदके झाली अाहेत. यामध्ये १४६ सुवर्ण, ८० राैप्य अाणि २३ कांस्यपदकांचा समावेश अाहे. यासह भारताने पदकतालिकेतील अापले अव्वल स्थान कायम अधिक मजबूत केले. दुसरीकडे युवा नेमबाजांनीही अापली साेनेरी यशाची परंपरा कायम ठेवताना पदकांवर नाव काेरले. कविताने महिलांच्या पुर्ण मॅरेथाॅनमध्ये २ तास ३८ मिनिटे ३८ सेकंदांमध्ये निश्चित अंतर पूर्ण करताना सुवर्णपदकावर नाव काेरले. अाॅलिम्पिक स्पर्धेतील पात्रतेसाठी २ तास ४२ मिनिटांचे लक्ष्य हाेते. श्रीलंकेची राजशेखरा राैप्य व अनुराधी कांस्यपदकाची मानकरी ठरली. तसेच पुरुष गटात भारताच्या नितेंदर सिंगने अापला दबदबा कायम ठेवला. त्याने या गटात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने २ तास १५ मिनिटे १८ सेकंदांमध्ये निश्चित अंतर पूर्ण केले. त्यापाठाेपाठ श्रीलंकेच्या इंदरजित कुरियनने राैप्यपदक पटकावले.
अॅथलेटिक्समध्ये साेनेरी कामगिरी
यजमान भारतीय संघाने अॅथलेटिक्समध्ये साेनेरी कामगिरी केली. या खेळ प्रकारामध्ये भारताने एकूण ५९ पदके जिंकली. यामध्ये २८ सुवर्ण, २२ राैप्य अाणि ९ कांस्यचा समावेश अाहे.

महाराष्ट्राची दुसरी धावपटू
अागामी रिओ अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कविता राऊत ही महाराष्ट्राची दुसरी धावपटू ठरली. यापूर्वी गतवर्षी महाराष्ट्राच्या ललिता बाबरने रिओ अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवले हाेते. त्यामुळे अाता महाराष्ट्राच्या दाेन अव्वल धावपटू ब्राझीलमधील रिओ अाॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे.

भारतीय हाॅकी टीमला राैप्यपदक
भारतीय हाॅकी टीमला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. यजमान टीमला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. पाकने १-० ने फायनल जिंकली.

पदकतालिका
देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण

भारत १४६ ८० २३ २४९
श्रीलंका २५ ५३ ७९ १५७
पाकिस्तान ०८ २३ ४३ ७४
बांगलादेश ०४ १२ ४२ ५८
नेपाळ ०१ १२ २० ३३
अफगाण ०१ ०३ ११ १५
मालदीव ०० ०२ ०१ ०३
भूतान ०० ०१ ०४ ०५