आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या ४९ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद वरिष्ठ गटाच्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने विजयी सलामी दिली. रेेल्वेच्या पुरुष व कोल्हापूरच्या महिला संघानेही एकतर्फी विजय मिळविले.
स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशवर २०-४ असा डावाने तर व पुरुष संघाने उत्तर प्रदेशवर २५-३ असा डावाने दणदणीत विजय मिळवला. पुरुष संघातील विजयाचा मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारा नरेश सावंत ठरला. त्याने आपल्या धारदार आक्रमणात ६ गडी बाद करीत २.३० मिनिटे पळती केली. महेश शिंदे (२.३० मिनिटे) व दीपक माने यांनी संरक्षणाची तर युवराज जाधव (४ गुण) व मिलिंद चवरेकरने (६ गुण) आक्रमणाची बाजू सांभाळली. महिला गटात सारिका काळे (२.५० मि. व २ गुण) व ऐश्वर्या सावंत (१.३० मि. २ गुण)यांनी अष्टपैलू कामगिरी केली. प्रियांका भोपी (३.०० मिनिटे) संरक्षणात साथ दिली. शीतल भोईर, सुप्रिया गाढवे व अारती कांबळे यांनी आपल्या अाक्रमणात प्रत्येकी ४ बळी टिपले.
गतविजेत्या रेल्वेने तामिळनाडूवर १७-६ असा एक डावाने निर्विवाद विजय मिळवला. त्यांच्या आनंदकुमार(३.३० मि.२ गुण), महेश माळगे (२.३० मि. व ३ गुण) व मनोज पवार(२.१० मि. व २ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. कोल्हापूरच्या महिलांनी मध्य प्रदेशवर १०-३ अशी डावाने मात केली. करिश्मा रिकीबदार (४.०० मि. व ३ गुण) तर अमृत कोकीटकर ( ३ गुण) हे विजयाचे शिल्पकार ठरले.
नाबाद ९ मिनिटे दोघांचे संरक्षण
सलामीच्या दिवशी सोमवारी केरळच्या शिवोकने उत्तराखंडविरुद्ध तर मंगळवारी गुजरातच्या हरेंद्र सुसोधयने नाबाद ९ मिनिटे पळती केली. हरेंद्रने बिहारविरुद्ध ही कामगिरी केली. हरेंद्रने ४ बळीही टिपले. गुजरातने बिहारचा ३१-३ ने धुव्वा उडविला.
महिला : मध्य भारत १८ डावाने वि.वि. झारखंड : ४. छत्तीसगड :५. वि. वि. गोवा : ४. तामिळनाडू : १६ वि.वि. पंजाब ०.
पुरुष : छत्तीसगड : १२, वि.वि. मध्य भारत : ११ हरियाणा : १७, वि.वि. गाेवा : ७. तेलंगणा : २८ वि.वि. पंजाब ५ (जीवनज्योतसिंग १).