आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुगे विकणाऱ्याने कर्ज काढून मुलीला स्पर्धेसाठी पाठवले; मुलीला सुवर्ण, अाता यूथ स्पर्धेसाठी निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दल्लीराजहरा (छत्तीसगड) - वडिलांकडे केसरी सांगेला खेळण्यास पाठवण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी कर्ज घेऊन मुलीला पाठवले. मुलीनेही निराश केले नाही. तिने राष्ट्रीय मुआय थाय चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. आता केसरी सांगेची निवड ऑगस्टमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या यूथ इंटरनॅशनल स्पर्धेसाठी झाली आहे. मुआय थाय मार्शल आर्ट््सचाच एक प्रकार आहे. हा थायलंडचा राष्ट्रीय खेळ आहे. छत्तीसगड ९ वर्षांपासून यात राष्ट्रीय चॅम्पियन आहे.

केसरीचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. तिचे वडील लक्ष्मण सांगे फुगे विकून कुटुंबाचा खर्च चालवतात. तिच्या दोन मोठ्या बहिणी दुकानात काम करून घरखर्चात योगदान देतात. केसरीची निवड जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मुआय थाय स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला ८ ते १० हजार रुपयांची गरज होती. केसरीने जयपूरला खेळायला जावे, असे वडिलांना वाटत होते. मात्र, त्यांच्याकडे तिला पाठवण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी ८ हजार रुपयांचे कर्ज घेऊन मुलीला खेळण्यास पाठवले. केसरीने ज्युनियर गटात (१५-१७ वर्षे) फायनलमध्ये दिल्लीच्या मुलीला हरवून सुवर्णपदक जिंकले. या प्रदर्शनाच्या आधारावर तिची बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूला जेवण आणि निवासाची व्यवस्था सोडून जाण्या-येण्याचा खर्च स्वत:ला करावा लागतो. यात स्पर्धा शुल्क आणि येण्या-जाण्याचा खर्च सामील असतो. सोबतच ट्रॅक सूटची व्यवस्थाही स्वत:ला करावी लागते. यासाठी मुआय थाय फेडरेशनने केसरीला ५० ते ६० हजार रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. पैशाची व्यवस्था झाल्यानंतर ती बँकाॅक येथील स्पर्धेत सहभागी होऊ शकते. याआधी केसरीने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली आहेत.

मुआय थाय फेडरेशनने म्हटले की,"खेळाडूंना स्पर्धेत घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे बजेट नाही. खेळाडूंना स्वखर्चाने स्पर्धेत सहभागी व्हावे लागते. पैशाच्या उणिवेमुळे अनेक वेळा प्रतिभावंत खेळाडूंचा आत्मविश्वास खचतो आणि ते खेळापासून दूर होतात.'
बातम्या आणखी आहेत...