आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NBA Finals Cleveland Cavaliers Beat Golden State Warriors

जेम्समुळे कॅवेलियर्सची वॉरियर्सवर शानदार मात, फायनल्समध्ये २-१ ने आघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लिव्हलँड (अमेरिका) - एनबीए फायनल्सला पहिल्यांदा जिंकण्याचे स्वप्न घेऊन खेळत असलेल्या क्लिव्हलँड कॅवेलियर्सचा बास्केटबॉल संघ आपल्या लक्ष्याकडे हळूहळू आगेकूच करत आहे. संघाचा कर्णधार लेबरन जेम्सच्या दमदार खेळाच्या बळावर यजमान कॅवेलियर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सला तिसऱ्या सामन्यात ९६-९१ ने पराभूत करून २-१ ने आघाडी घेतली.

कॅवेलियर्सने पहिल्यांदा एनबीए फायनल्सचा सामना आपल्या घरच्या कोर्टवर जिंकला आहे. सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये वॉरियर्सच्या स्टीफन करीने शानदार खेळ करत सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र, जेम्स आणि मॅथ्यूने जबरदस्त खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मॅथ्यूने २० गुणांची कमाई केली. वॉरियर्सच्या करीने एकाकी झुंज देताना सर्वाधिक २७ गुण मिळवले. यातील २४ दुसऱ्या हाफमध्ये झाले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ७२-५५ ने आघाडी घेतलेल्या कॅवेलियर्सला चौथ्या क्वार्टरमध्ये वॉरियर्सने जोरदार झुंज दिली. एक वेळ स्कोअरमध्ये वॉरियर्सचा संघ अवघ्या ३ गुणांनी मागे होता. सामना ओव्हर टाइममध्ये जाईल, असे वाटत होते. मात्र, जेम्सने ७ गुणांची कमाई करीत आपल्या संघाला पुढे पोहोचवले.

चाहत्यांचा जल्लोष
अमेरिकेत चाहत्यांच्या उत्साहावरून त्यांचे एनबीएवर किती प्रेम आहे हे िदसून येते. विजयानंतर एरिनाच्या बाहेर येऊन चाहत्यांनी रस्त्यांवर जल्लोष केला. चाहत्यांमुळे रस्ता पूर्ण जाम झाला. काही वेळा गाड्यांची लांब रांग लागली होती. ट्रॅफिक जाम झाले होते. चाहते रस्त्यांवर जल्लोष करत होते. प्रत्येक जण सामन्याबाबत बोलत होता. शहरातील सर्व क्लब आणि बारमध्ये या सामन्याचा आनंद लुटणाऱ्यांची संख्या मोठी होती.