आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनबीए: कॅवेलियर्सला नमवून वाॅरियर्सचे कमबॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - एनबीएच्या अजिंक्यपदासाठीची लढत अाता राेमांचक हाेत अाहे. गाेल्डन स्टेन वाॅरियर्सने एनबीए फायनल्सच्या चाैथ्या सामन्यामध्ये क्वीवलॅड कॅवेलियर्सचा १०३-८२ अशा फरकाने पराभव केला. यासह विजेत्या टीमने बेस्ट अाॅफ सेव्हनच्या सामन्यात २-२ ने बराेबरी साधली. वाॅरियर्सच्या विजयामध्ये स्टीफन करी अाणि अांद्रे इगुडालाने प्रत्येकी २२ गुणांचे याेगदान दिले. कॅवेलियर्सकडून रशियाच्या मुजगाेवने सर्वाधिक २८ गुणांची कमाई केली. टीमचा स्टार खेळाडू लेबरन जेम्स (२०) सामन्यात सपशेल अपयशी ठरला.

क्वीकेंन लाेंस एरिनामध्ये अपेक्षेप्रमाणे चाहत्यांची माेठ्या संख्येत गर्दी हाेती. तसेच ‘गाे कॅवस गाे’अशा प्रकारच्या घाेषणांनी स्टेडियम दणाणून सुटले हाेते. मात्र, टीममध्ये तसाच कुठलाही उत्साह दिसला नाही. बास्केटबाॅलच्या सामन्यात ७-० ने दमदार सुरुवात करणाऱ्या कॅवेलियर्सला दाेन्ही क्वाॅर्टरमध्ये समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे ही टीम ४२-५४ ने पिछाडीवर पडली हाेती. तिसऱ्या क्वाॅर्टरमध्ये या टीमने सहा गुणांची कमाई करून पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, चाैथ्या क्वार्टरमध्ये वाॅरियर्सच्या टीमने अापला दबदबा कायम ठेवला.
डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर काेर्टवर
कॅवेलियर्सच्या समर्थनार्थ रेसलर रिक फ्लेअरदेखील सेंटर काेर्टवर उतरले हाेते. ते अाल्यानंतर चाहत्यांनी उभे राहून स्वागत केले. त्यांच्यासाेबत युवा खेळाडू डाेलफर जिगलर अाणि मिंजदेखील हाेते.

चाहत्यांनी फिरवली पाठ
सामन्याच्या चाैथ्या क्वार्टरमध्ये वाॅरियर्सने निर्णायक अाघाडी घेतल्यानंतर कॅवेलियर्सचे चाहत्यांनी लगेच स्टेडियम साेडण्यास सुरुवात केली. सामन्यातील दहा मिनिटांचा खेळ शिल्लक असताना स्टेडियममधील अर्ध्यापेक्षा अधिक अासने रिकामे झाली हाेती.

जेम्सच्या डाेक्याला दुखापत
लढतीच्यातिसऱ्या क्वाॅर्टरमध्ये खेळताना लेबरन जेम्सच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. बास्केट करण्याच्या प्रयत्नात असताना ताे समाेरील खुर्चीवर जाऊन पडला. त्यामुळे त्याला दुखापत झाली. यातूनच काही काळ सामना थांबवण्यात अाला हाेता.