आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

97% चाहत्यांचा फिफावर नाही विश्वास, फुटबॉलवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने 50 देशांतील 25000 लोकांचा केला सर्व्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलंडचे ६९% चाहते फिफाशी नाखुश. - Divya Marathi
हॉलंडचे ६९% चाहते फिफाशी नाखुश.
झुरिच - मागच्या वर्षी फेब्रुवारीत गियानी इन्फेंटिनो फिफाचे अध्यक्ष बनले तेव्हा फुटबॉलची ही विश्व संघटना अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे, असे त्यांनी सांगितले. लोकांचा या संस्थेवरून विश्वास उडाला आहे. मात्र, आता मी तुम्हा सर्वांचा अध्यक्ष आहे. आपण नव्या युगात प्रवेश करत आहोत. आम्ही एक वर्षाच्या आत लोकांचा विश्वास पुन्हा जिंकू. संघटनेत जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, तो संपवू, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, अद्याप तसे घडलेले नाही.  

इन्फेंटिनो अध्यक्ष बनल्यानंतर एक वर्षाने फिफावर झालेल्या सर्व्हेतून आलेली आकडेवारी वेगळीच कथा सांगतात. स्वित्झर्लंडच्या फोर्जा फुटबॉल आणि भ्रष्टाचारवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरातील ५० देशांच्या २५ हजार फुटबॉल चाहत्यांचा सर्व्हे केला. त्यांनी फिफा, जगभरात फुटबॉलची स्थिती आणि रशिया व कतर येथे होणाऱ्या विश्वचषकाबाबत प्रश्न विचारले. यातील ९७ टक्के लोकांचा फिफावर विश्वास राहिला नाही. फुटबॉलच्या  या जागतिक संघटनेत पसरलेल्या भ्रष्टाचारामुळे हे चाहते दु:खी आहेत. तर ६६ टक्के चाहते मॅच फिक्सिंगमुळे चिंतित आहेत. सर्व सामन्यांत मॅच फिक्सिंग होते, असे त्यांना वाटते. येत्या २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषकाबाबतही या सर्व्हेत चाहत्यांना प्रश्न विचारण्यात आले. यातील ४३ लोकांना रशियात विश्वचषक होऊ नये, असे वाटते. रशिया आणि कतर यांना पुढचे दोन विश्वचषक देण्यातही भ्रष्टाचार झाला आहे, असे चाहत्यांचे मत आहे. फिफाला चाहत्यांचा विश्वास जिंकावा लागेल. चाहत्यांशिवाय फुटबॉलची काहीच किंमत नाही. यामुळे खेळाचे नुकसान तर होईलच, शिवाय व्यवसायावरही मोठा प्रभाव पडेल, असे चाहत्यांना वाटते. सर्व्हे करणाऱ्या संस्थेचे सीईओ पॅट्रिक आर्नेन्सन म्हणाले, “सर्व अडचणी फिफाच्या व्यवस्थेत आहेत. ब्लाटर यांनी १७ वर्षे ही संस्था ज्या पद्धतीने चालवली, जे नियम बनवले, ते अजूनही सुरू आहेत. यामुळे यात बदल झालेला अजून दिसलेला नाही. इन्फेंटिनो यांनी नव्याने सुरुवात केली पाहिजे. एका 

रात्रीत चमत्कार घडणार नाही. मात्र, त्यांनी प्रयत्न केले तर ते पुन्हा चाहत्यांचा विश्वास जिंकू शकतील.’  
मे २०१५ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणात फिफाच्या ७ अधिकाऱ्यांना अटक झाली होती. यात अध्यक्ष सॅप ब्लाटरसह युरोपियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मायकेल प्लाटिनी यांचा समावेश होता. 
बातम्या आणखी आहेत...