आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिसः योकोविक, नदाल, कर्बर अंतिम १६ मध्ये; सिलिचचा पराभव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- वर्ल्डनंबर वन नोवाक योकोविक, चौथा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि महिला गटात दुसरी मानांकित जर्मनीची अँजोलिक कर्बर यांनी विजयासह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. सानियाने मिश्र दुहेरीत दुसरी फेरी गाठली.

नदालने शानदार प्रदर्शन करताना रशियाच्या आंद्रे कुज्नेत्सोवाला सरळ सेटमध्ये ६-१, ६-४, ६-२ ने हरवले. या विजयासह नदालने आपले फिटनेस सिद्ध केले. हाताच्या दुखापतीला मागे टाकताना त्याने शानदार प्रदर्शन केले. आता नदालसमोर २४ व्या मानांकित फ्रान्सच्या लुकास पोइलीचे आव्हान आहे. त्याने १५ व्या मानांकित स्पेनच्या रॉबर्टा बोटिस्टा अगूतला पाच सेटच्या संघर्षानंतर ३-६, ७-५, २-६, ७-५, ६-१ ने मात दिली. दहावा मानांकित गाएल मोंफिल्सने स्पेनच्या निकोलास अलमार्गोला ६-४, ६-२, ६-४ ने हरवले. मात्र, सातवा मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिचचा धक्कादायक पराभव झाला. त्याला अमेरिकेच्या जॅक सॉकने ६-४, ६-३, ६-३ ने पराभूत केले.

युजनीने सामना साेडला : अव्वलमानांकित योकोविकाचा विरोधी खेळाडू रशियाचा मिखाईल युजनी निवृत्त होऊन बाहेर पडला. पहिल्या सेटमध्ये २-४ ने मागे पडल्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे युजनीने सामन्यातून माघार घेतली.

कर्बरचा५५ मिनिटांत विजय
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या अँजोलिक कर्बरने १७ वर्षांची अमेरिकेची क्वालिफायर खेळाडू सीसी बेलिसला अवघ्या ५५ मिनिटांत ६-१, ६-१ ने हरवले.

पेस-बोपन्नाचापराभव : लिएंडरपेस आणि जर्मनीचा त्याचा जोडीदार आंद्रे बेगेमन यांना फ्रान्सचा स्टिफन रॉबर्ट आणि इस्रायलचा डुडी सेलाकडून पराभव झाला.
पुढे वाचा, सानिया मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत
बातम्या आणखी आहेत...