विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या ५ हजार मीटर शर्यतीत मुंबई शहरच्या संगीता नाईकने १७.४८.०७ सेकंदांत सुवर्णपदक पटकावले. तिने कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटीलला १८.३६.०२ सेकंद मागे टाकले. मीनाक्षीने रौप्यपदक, तर मुंबई शहरच्या वर्षा भावरीने १८.४३.०३ से. कांस्य जिंकले. पुरुष गटात रेल्वेच्या अमोल सकपाळने १५.३५.०४ सेकंदांत सुवर्ण धाव घेतली. सीआरपीएफच्या बालाजी कांबळेने १५.५२.०७ सेकंदांत रौप्य व सीआरपीएफच्याच प्रभाकर गहाळेने १६.१७.०१ सेकंदांत कांस्य आपल्या नावे केले.
संजना लहांगेची विक्रमी धाव : अडथळ्याच्या शर्यतीत ठाण्याच्या संजना लहानेने नव्या विक्रमाची नोेंद केली. तिने स्वत:चा १७.५ सेकंदांचा विक्रम मोडित काढला. संजनाने १६.०७ सेकंदांत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रशिक्षण संचालनालयच्या राणी नेमाने १८.०८ सेकंदांत रौप्य, तर मुंबई शहरच्या आशा झणझणने १९.०९ से. कांस्य जिंकले. पुरुष गटात मुंबई शहरच्या सोनुसिंग पाटीने १६.०२ सेकंदांची वेळ देत सोने जिंकले. कोल्हापूरच्या अभिजित पाटीलने १६.४ सेकंदांत रौप्यपदक मिळवले.
वनिताची सर्वात लांब उडी : प्रशिक्षण संचलनालयाच्या वनिता पवारने ४.८६ मीटर लांब उडी घेत सुवर्णपदकावर कब्जा केला. नागपूर विभागाच्या ज्योती भतानेने ४.७६ मीटर उडीसह रौप्यपदक आणि अमरावती विभागाच्या रेखा लाडकरने ४.५६ मीटर लांब उडी घेत कांस्यपदक मिळवले.
सागर, सोनियाने मारली बाजी : ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत अमरावतीच्या सागर देशमुखने ४९.०८ से. आणि मुंबई शहरच्या सोनिया मोकलने ५९.०८ सेकंदांत सुवर्ण जिंकले. पुरुष गटात कोकण विभागाच्या राहुल काळेने ५०.०४ से. रौप्य मिळवले.